Photo of Mango cake by Shilpa Deshmukh at BetterButter
978
8
0.0(0)
0

मँगो केक

May-20-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो केक कृती बद्दल

आंबा आणि त्याचे पदार्थ सर्वानाच आवडतात .आता आंब्याचा सिझन सुरु आहे मग एकदा तरी केक व्हायलाच पाहिजे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मँगो पल्प 1 कप
  2. मैदा 1 कप
  3. कंडेन्स मिल्क 1/2 कप
  4. पिठी साखर 1/2 कप
  5. बटर 1/2 कप
  6. बदाम क्रश 1 tbsp
  7. काजू क्रश केलेले 1 tbsp
  8. बेकिंग पावडर 1 tbsp
  9. बेकिंग सोडा 1 tbsp
  10. क्रीम चीज 50gr.
  11. व्हिपिंग क्रीम 1/2 कप
  12. पिठी साखर 1/3 tbsp
  13. दूध 1/3 कप
  14. मँगो इसेन्स 1 tbsp

सूचना

  1. मायक्रोवेह 180°वर प्रीहीट करा
  2. मँगो पल्प बटर आणि कंडेन्स मिल्क एका मिक्सिन्ग बाउल मध्ये घ्या आणि बिट करा
  3. मिश्रण एकजीव झालं की त्यामध्ये साखर घालून बिट करा तुम्ही इलेक्ट्रिक बिटर किंवा हॅन्ड बिटर काहीही वापरू शकता.
  4. मैदा ,सोडा ,बेकिंग पावडर चाळून घ्या आणि बिट केलेल्या मिश्रणात घाला ,एकदम टाकायचं नाही तीन वेळा थोडं थोडं टाकायचं आणि फेटून घ्यायच म्हणजे गुठळ्या होणार नाही.
  5. आता दूध आणि ड्रायफ्रूट टाकून परत फेटून घ्या
  6. इसेन्स घालून फेटून घ्या .इसेन्स प्लस कलर असेल तर उत्तम केकला रंगही छान येईल.
  7. केक टिन ला बटरने ग्रीसिंग करा तळाशी बटर पेपर ठेवा आणि आता मिश्रण टिन मध्ये समान टाका.
  8. एकदा खाली टॅप करा म्हणजे एअर निघून जाईल
  9. 25-30 मिनिट सेट करून केक बेक करा
  10. टूथपिक घालून चेक करा बेक झाला का जर टूथपिक ला काहीच चिपकलं नाही तर समजायचं बेक झाला
  11. दहा मिनिट थंड झाल्यावर टिन मधून अलगद काढा
  12. चीज ,व्हिपिंग क्रीम आणि साखर बिट करुन केकचे dresing करा
  13. आवडीच्य फळांनी ,जसं चेरी ,बेरीज ,स्ट्रॉबेरी नि गार्निश करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर