Photo of Kolambi Masala by Deepa Gad at BetterButter
946
11
0.0(0)
0

Kolambi Masala

May-20-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kolambi Masala कृती बद्दल

कोलंबी साफ करून त्याला मीठ, मालवणी मसाला, कोकम आगळ लावून मॅरीनेट करायला ठेवा. कांदा खोबऱ्याचे भाजलेले वाटण करून ठेवा. कढईत २ च तेलात कढीपत्ता, कांदा टोमॅटो चिरलेला घालून चांगला परता. त्यात आलं- लसूण पेस्ट, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर, घालून परता. बटाट्याचे तुकडे करून घाला थोडं पाणी घालून बटाटे अर्धवट शूजली की मारीनाटेड कोलंबी टाका परतून झाकून ठेवून चांगला शिजवा. नंतर थोडं पाणी घालून शिजवा. शिजले की भाजलेले वाटण घाला मीठ , कोकम किंवा चिंचेचा कोळ घाला, उकळी आली की गॅस बंद करून वरून कोथिंबीर पेरा.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. कोलंबी १ मोठी वाटी
  2. बटाटा १
  3. कांदे ३
  4. खोबरे अर्धी कवड
  5. मालवणी मसाला दीड चमचा
  6. धनेजिरे पावडर अर्धा च
  7. कढीपत्ता ,७-८ पाने
  8. आलं-लसूण पेस्ट १ च
  9. कोकम आगळ १ च
  10. मीठ
  11. कोकम ४-५ किंवा चिंचेचा कोळ २ च
  12. कोथिंबीर २ च

सूचना

  1. प्रथम कोलंबी साफ करून मीठ, मसाला, कोकम आगळ लावून मॅरीनेट करायला ठेवा
  2. कांदा व खोबरे भाजून घ्या व वाटण करा
  3. कढईत तेलात कढीपत्ता, कांदा, टोमॅटो चांगला परता
  4. आलं- लसूण पेस्ट, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर घालून परता
  5. बटाट्याचे तुकडे व थोडं पाणी घालून बटाटे अर्धवट शिजवा
  6. नंतर त्यात मॅरीनेट केलेली कोलंबी घालून परता झाकण ठेवून एक वाफ काढा
  7. नंतर थोडा पाणी घालून शिजेपर्यंत ठेवा
  8. बटाटे शिजले की त्यात भाजलेला वाटण घालून परत थोडं पाणी , मीठ चवीनुसार , कोकम किंवा चिंचेचा कोळ घालून शिजवा
  9. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर