मुख्यपृष्ठ / पाककृती / जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल)

Photo of Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) by Ajinkya Shende at BetterButter
609
9
0.0(0)
0

जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल)

May-23-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल) कृती बद्दल

रखरखत्या उन्हात काहीतरी थंडगार पेय पिण्याची इच्छा होतेचं.पेप्सी,कोकाकोला,थम्ब्स अप ह्या शरीराला हानिकारक शितपेयांपेक्षा कलिंगड,खरबूज ह्यांसारख्या पाणीदार फळांचा रस पिणे कधीही उत्तम आणि ह्यात काहीतरी वेगळा फ्लेवर देण्यासाठी ह्यात जिंजर लेमन सिरप सुध्दा वापरलं आहे...

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाटी खरबुजाच्या मोठ्या आकारात कापलेल्या फोडी
  2. २ वाटी कलिंगडाच्या मोठ्या आकारात कापलेल्या फोडी
  3. अर्धी वाटी पीठीसाखर
  4. एका मोठ्या लिंबाचा रस
  5. अर्धा चमचा किसलेलं आलं
  6. ५-६ पुदिन्याची पानं
  7. पाव चमचा चाट मसाला
  8. ५-६ बर्फ़ाचे तुकडे

सूचना

  1. प्रथम ज्युसर जार मध्ये किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात कलिंगड व खरबुजाच्या फोडी टाकून त्याचा ज्यूस बनवून घ्यावा.
  2. नंतर हा ज्यूस एका भांड्यात गाळून त्यात पुदिन्याची पानं कुस्करून टाकावेत व ज्यूस फ्रिज मध्ये थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवावा.
  3. तोपर्यंत एका पॅन मध्ये साखर,साखरेएवढचं पाणी आणि आल्याचा किस टाकून गुलाबजाम ला करतो त्या कंसिस्टंसी चा पाक तयार करून घ्यावा.
  4. पाक तयार होत आला की त्यात लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून सिरप एका बाऊल मध्ये काढून घ्यावे.
  5. नंतर एका ग्लास मध्ये २-३ बर्फाचे तुकडे,चाट मसाला,थोडं जिंजर-लेमन सिरप टाकून तयार मॉकटेल ग्लास मध्ये ओतावं.
  6. गार्निशिंग साठी वरून २-३ पुदिन्याची पानं ठेवावी व थांडगार जिंजर-लेमन फ्लेवर्ड मेलन पंच चा आनंद घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर