मुख्यपृष्ठ / पाककृती / काजूची उसळ

Photo of Kajuchi Usal by Deepa Gad at BetterButter
975
5
0.0(0)
0

काजूची उसळ

May-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजूची उसळ कृती बद्दल

प्रथम ओले काजू नसतील तर सालवाले काजू घेऊन रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावे. सकाळी सोलून चांगले धुवून घ्यावेत. कांदा खोबऱ्याचे भाजलेले वाटण करून घ्यावे. कढईत तेल टाकून त्यावर कढीपत्ता, चिरलेला कांदा परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, भिजवलेले काजू टाकून परतून घ्या. तगोडे पाणी टाकून झाकण ठेवून अर्धवट शिजले की त्यात बटाट्याचे तुकडे टाका परत थोडं पाणी टाकून बटाटे शिजेपर्यंत शिजवा. नंतर वाटण घालून शिजवा, सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेले काजू मोठी १ वाटी,
  2. बटाटा १ मोठा
  3. भाजलेले कांदा खोबऱ्याचे वाटण १ वाटी
  4. कांदा १ बारीक चिरलेला
  5. आलं लसूण पेस्ट १ च
  6. मालवणी मसाला दीड च
  7. कढीपत्ता ७-८ पाने
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. ओले काजू किंवा सालीवाले काजू रात्रभर पाण्यात भिजवा
  2. बटाटे तुकडे करा व कांदा चिरून घ्या
  3. भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण करून घ्या
  4. कढईत २ मोठे च तेल घालून त्यात कढीपत्ता, चिरलेला कांदा चांगला परता
  5. आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ टाका
  6. भिजवून सोललेले धुवून काजू टाका
  7. थोडे पाणी घालून काजू झाकण ठेवून अर्धवट शिजवा
  8. बटाटे घाला व परत थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवा
  9. वाटण घाला, शिजवा
  10. कोथिंबीर पेरा
  11. बत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर