पाईन एप्पल अपसाईड डाऊन केक | Pine Apple Upside Down cake Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  27th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pine Apple Upside Down cake recipe in Marathi,पाईन एप्पल अपसाईड डाऊन केक, Deepa Gad
पाईन एप्पल अपसाईड डाऊन केकby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

पाईन एप्पल अपसाईड डाऊन केक recipe

पाईन एप्पल अपसाईड डाऊन केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pine Apple Upside Down cake Recipe in Marathi )

 • मैदा १ कप पेक्षा थोडासा कमी
 • साखर ३/४ कप
 • बटर ९० ग्राम
 • बेकिंग पावडर १/२ च
 • चिमूटभर मीठ
 • अंडी २
 • दूध २-३ च
 • पाईन एप्पल इस्सेन्स १/२ च
 • पाईन एप्पल क्रश २ च
 • पाईन एप्पलच्या गोल स्लाईस ४-५
 • पाईन एप्पल तुकडे २ च
 • सजावटीसाठी चेरी ४-५
 • कॅरामेलसाठी :
 • साखर ३ च
 • बटर १ च

पाईन एप्पल अपसाईड डाऊन केक | How to make Pine Apple Upside Down cake Recipe in Marathi

 1. मैदा, बेकिंग पावडर, मीठ ३ वेळा चाळून बाजूला ठेवा
 2. बटर, साखर फेटून घ्या
 3. त्यात अंड्याचे बलक, पाईन एप्पल क्रश, इस्सेन्स, घालून फेटा
 4. अंड्याचा पांढरा भाग घट्ट होईपर्यंत फेटून घ्या
 5. आता एकीकडे मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे प्रिहीट करायला ठेवा
 6. व एकीकडे गॅसवर कॅरामेलसाठी छोट्या पॅनवर साखर व बटर घालून ठेवा ढवळू नका रंग ब्राऊन झाला की केकटिनला बटरने ग्रीझ करून त्यात पसरा
 7. त्यावर पाईन एप्पलचे स्लाईस मधला भाग गोल कापून लावा
 8. स्लाईसच्या मधल्या भागात चेरी कापून लावा
 9. नंतर वरील बाऊलमध्ये चाळलेले मैद्याचे मिश्रण अर्धे व थोडे दूध आणि अंड्याचे मिश्रण असे क्रमाक्रमाने घालून चमच्याने कट फोल्ड (एकाच साईडने एकजीव ) करा,
 10. पाईन एप्पलचे तुकडे मिक्स करा हे झाले आपले बॅटर तयार
 11. हे बॅटर केकटीनमध्ये स्लाइसवर ओता
 12. केकटीन आपटा म्हणजे आतील हवा निघून जाईल
 13. प्रिहीट ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसला २५ मिनिटे बेक करा
 14. बाहेर काढून ठेवा थंड झाला की डिशमध्ये पलटा, कापून सर्व्ह करा

My Tip:

असाच तुम्ही अननसच्या ऐवजी संत्र्याचाही वापर करून केक बनवू शकता

Reviews for Pine Apple Upside Down cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo