कच्या केळीची कोफ्ता करी | Raw banana kofta curry Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raw banana kofta curry recipe in Marathi,कच्या केळीची कोफ्ता करी, sharwari vyavhare
कच्या केळीची कोफ्ता करीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  50

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

कच्या केळीची कोफ्ता करी recipe

कच्या केळीची कोफ्ता करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw banana kofta curry Recipe in Marathi )

 • कच्या केळी २
 • बेसन १ / २ कप
 • कांदा उभा चिरलेला १
 • टोमॉटो प्युरी १ कप
 • धने पावडर २ चमचे
 • जिरे पावडर २ चमचे
 • लाल मिरच्या २
 • बेडगी लाल तिखट २ चमचे
 • तेल
 • मिठ
 • लवंग २
 • मिरे २
 • दालचीनी १ तुकडा
 • तमालपत्र २
 • हिंग
 • जिरे
 • लसुण ४ ते ५ पाकळ्या

कच्या केळीची कोफ्ता करी | How to make Raw banana kofta curry Recipe in Marathi

 1. केळी ला कुकरमध्ये २ ते ३ शिट्टी करा
 2. साला काढा व बारीक करा
 3. त्यामध्ये बसेल इतके बेसन घाला
 4. तिखट, मिठ, जिरे, धने पावडर घाला व मिक्स करा
 5. त्याचे कोफ्ते करा व गरम तेला मध्ये तळून घ्या
 6. एका कढईत तेल घेऊन मिरे लवंग लाल मिरची घाला
 7. व मसाले तळा
 8. मग कांदा घाला परतुन घ्या
 9. लसुण घाला परतुन घ्या
 10. हे सर्व मिक्सर मधून काढा
 11. एका कढईत तेल घ्या
 12. जिरे , हिंग तमालपत्र घाला
 13. मिक्सर मधून काढलेले मिश्रण टाका
 14. तेल सुटे पर्यत परतुन घ्या
 15. टोमॉटो प्युरी टाका
 16. लाल मिरची घाला व मिक्स करा
 17. तेल सुटे पर्यत परतुन घ्या
 18. त्यामध्ये १ ग्लास पाणी घाला मिठ घाला
 19. पाणी उकळायले की कोफ्ते घाला
 20. २ मि उकळून घ्या

My Tip:

पाणी गरम घाला. कोफत्या मध्ये थोडे तांदळाचे पिठ घाला, कोफ्ते कुरकुरीत होतात

Reviews for Raw banana kofta curry Recipe in Marathi (0)