मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो पॅना कोट्टा
मँगो पन्ना कोट्टा २ आंब्याचा पल्प काढा त्यात काहीही घालू नका. बाऊलमध्ये ३ च कोमट पाणी घेऊन त्यात २ च जिलेटीन (unflavored geletin) टाकून ढवळा. हे पल्पमध्ये टाकून चांगलं ढवळा. सर्विगसाठी ग्लास घेऊन दुसऱ्या बाऊलमध्ये तिरका राहील असा ठेवा त्या ग्लासमध्ये ते मिश्रण चमच्याने अलगद घाला लेअर तिरका व्यवस्थित आला पाहिजे तसाच न हलविता ग्लास बाऊलसाहित फ्रीजमध्ये २ तास सेट करा. गॅसवर भांड्यात १ कप दूध कोमट गरम होत तोपर्यंत बाऊलमध्ये ३ च कोमट पाण्यात २ च जिलेटीन पावडर घालून व १ कप क्रीम दुधात घालून ढवळा . गॅस बंद करून थोडं कोमट झालं की वरील सेट करायला ठेवलेला ग्लास काढून त्यात हे दुधाचे मिश्रण ओता व परत फ्रीजमध्ये २ तास सेट करा. सजावटीसाठी वर आंब्याचे तुकडे, चेरी, पुदिना पानाने सजवा
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा