कसुरी मेथी घावन | Kasuri Methi Ghavan Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kasuri Methi Ghavan recipe in Marathi,कसुरी मेथी घावन, Sudha Kunkalienkar
कसुरी मेथी घावनby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

कसुरी मेथी घावन recipe

कसुरी मेथी घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kasuri Methi Ghavan Recipe in Marathi )

 • कसुरी मेथी २ टेबलस्पून
 • तांदुळाचे पीठ ६ टेबलस्पून
 • लसूण ७-८ पाकळ्या
 • मीठ चवीनुसार
 • तूप घावन भाजताना लावण्यासाठी

कसुरी मेथी घावन | How to make Kasuri Methi Ghavan Recipe in Marathi

 1. कसुरी मेथी सुकीच कुरकुरीत होईपर्यंतभाजून घ्या. गार झाल्यावर हाताने चुराकरा.
 2. लसूण सोलून बारीक तुकडे करून घ्या
 3. एका पातेल्यात तांदुळाचे पीठ, कसुरीमेथी पावडर, लसूण तुकडे आणि मीठघाला . पाणी घालून भिजवा. गुठळ्या होऊदेऊ नका . पीठ अगदी पातळ भिजवा(रवा डोसा पिठा सारखे ). १० मिनिटेझाकून ठेवा.
 4. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करा . वाफ येईपर्यंत गरम झाला पाहिजे.
 5. गॅस मोठा असताना एका डावाने पीठतव्यावर घाला. डाव तव्यापासून थोडा दूरधरून डाव हळू हळू गोल फिरवत पीठतव्यावर घाला म्हणजे पातळ घावनघातला जाईल . आता गॅस बारीक करूनझाकण ठेऊन २-३ मिनिटे भाजा .
 6. झाकण काढून घावन परतून घ्या . वरून थोडे तूप सोडा आणि दुसऱ्या बाजूनेझाकण न ठेवता भाजून घ्या
 7. गरमागरम घावन चटणी आणिलोण्याबरोबर खावयास द्या . फार चविष्टलागतात

Reviews for Kasuri Methi Ghavan Recipe in Marathi (0)