मुख्यपृष्ठ / पाककृती / कसुरी मेथी घावन

Photo of Kasuri Methi Ghavan by Sudha Kunkalienkar at BetterButter
1054
2
0.0(0)
0

कसुरी मेथी घावन

May-30-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कसुरी मेथी घावन कृती बद्दल

घावन हा कोकणातला प्रसिद्ध खाद्यपदार्थआहे. तांदुळाचे पीठ पाण्यात भिजवूनत्याचे पातळ डोसे म्हणजे घावन. अगदीझटपटीत होणारा चविष्ट पदार्थ. कसुरीमेथी कोकणात वापरत नाहीत . कसुरीमेथी घावन ही उत्तर भारत आणि कोकण यांची फ्युजन रेसिपी आहे. हे माझं इनोव्हेशन आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कसुरी मेथी २ टेबलस्पून
  2. तांदुळाचे पीठ ६ टेबलस्पून
  3. लसूण ७-८ पाकळ्या
  4. मीठ चवीनुसार
  5. तूप घावन भाजताना लावण्यासाठी

सूचना

  1. कसुरी मेथी सुकीच कुरकुरीत होईपर्यंतभाजून घ्या. गार झाल्यावर हाताने चुराकरा.
  2. लसूण सोलून बारीक तुकडे करून घ्या
  3. एका पातेल्यात तांदुळाचे पीठ, कसुरीमेथी पावडर, लसूण तुकडे आणि मीठघाला . पाणी घालून भिजवा. गुठळ्या होऊदेऊ नका . पीठ अगदी पातळ भिजवा(रवा डोसा पिठा सारखे ). १० मिनिटेझाकून ठेवा.
  4. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करा . वाफ येईपर्यंत गरम झाला पाहिजे.
  5. गॅस मोठा असताना एका डावाने पीठतव्यावर घाला. डाव तव्यापासून थोडा दूरधरून डाव हळू हळू गोल फिरवत पीठतव्यावर घाला म्हणजे पातळ घावनघातला जाईल . आता गॅस बारीक करूनझाकण ठेऊन २-३ मिनिटे भाजा .
  6. झाकण काढून घावन परतून घ्या . वरून थोडे तूप सोडा आणि दुसऱ्या बाजूनेझाकण न ठेवता भाजून घ्या
  7. गरमागरम घावन चटणी आणिलोण्याबरोबर खावयास द्या . फार चविष्टलागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर