कच्या आंब्याचा जॅम | Kachya aambyacha jam Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kachya aambyacha jam recipe in Marathi,कच्या आंब्याचा जॅम, Pranali Deshmukh
कच्या आंब्याचा जॅमby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

कच्या आंब्याचा जॅम recipe

कच्या आंब्याचा जॅम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kachya aambyacha jam Recipe in Marathi )

 • कच्या कैऱ्या 4
 • साखर 2 वाटी
 • खाण्याचा रंग चिमूटभर
 • वेलची पावडर 2 tbs

कच्या आंब्याचा जॅम | How to make Kachya aambyacha jam Recipe in Marathi

 1. आंबे मोठे हवेत जास्त गर असणारे .
 2. आंबे कुकरमध्ये वाफवून घ्या
 3. थंड झाल्यावर चमच्याने गर काढून घ्या
 4. जितका गर त्याच्या दुप्पट साखर घ्या
 5. मी 1 वाटी मोठी भरून गर काढला म्हणून 2 वाट्या साखर घेतली
 6. जाड बुडाच्या कढईत साखर आणि गर शिजवायला ठेवा
 7. मिश्रण पातळ होईल मंद आचेवर सारखे हलवत राहा
 8. जेव्हा मिश्रण चिकट आणि घट्ट होईल त्यावेळी रंग आणि वेलची पूड टाका
 9. थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवा
 10. मुलांना पोळी बरोबर किंवा ब्रेडला लावून द्या.

Reviews for Kachya aambyacha jam Recipe in Marathi (0)