केळ्याची गोड पुरी | Sweet Banana Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Banana Puri recipe in Marathi,केळ्याची गोड पुरी, Sujata Hande-Parab
केळ्याची गोड पुरीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

केळ्याची गोड पुरी recipe

केळ्याची गोड पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Banana Puri Recipe in Marathi )

 • गहू पीठ - १ १/२ कप
 • केळी लगदा केलेली - 2 मध्यम, सोललेले, मॅश किंवा लगदा केलेले
 • किसलेला गूळ - १ १/२ टेबलस्पून 
 • जायफळ पावडर - १/४ टीस्पून
 • वेलची पूड - १/२ टीस्पून
 • मीठ - १/४ टीस्पून
 • तेल - १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप तळण्यासाठी 
 • पाणी - 2-3 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी किंवा लागेल तसे वापरावे

केळ्याची गोड पुरी | How to make Sweet Banana Puri Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, जायफळ आणि वेलचीपूड, किसलेले गूळ, केळ्याचा लगदा घ्या. मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र होईपर्यंत मिसळा.
 2. आवश्यक असल्यासच पाणी घाला आणि घट्ट पीठ मळून घ्या
 3. झाकण घालून 20-30 मिनिटे ठेवा
 4. कढईत तेल गरम करावे
 5. पुन्हा पीठ थोडे मळून घ्या. थोडेसे पीठ काढाआणि बॉल करा.
 6. रोलिंग बोर्ड ला थोडे तेल लावून घ्या
 7. एक पिठाचा छोटा गोळा ठेवा आणि सर्व बाजूंनी समान रीतीने रोल किंवा लाटून घ्या. पुरी थोडी जाड असावी.
 8. पुरी मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी गोल्डन ब्राऊन आणि फुगे पर्यंत तळून घ्या.
 9. चहा किंवा कोणत्याही कढीसोबत किंवा भाजी सोबत गरमागरम सर्व्ह करा.

My Tip:

पुरी साठी पीठ घट्ट मळावे. पाणी लागले तरच पीठ मळण्यासाठी वापरावे. जास्त पिकलेली केळी वापरली तरी चालतील.

Reviews for Sweet Banana Puri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo