केळ्याचे शिकरण | Banana Shikran Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Shikran recipe in Marathi,केळ्याचे शिकरण, Sujata Hande-Parab
केळ्याचे शिकरणby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

केळ्याचे शिकरण recipe

केळ्याचे शिकरण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Shikran Recipe in Marathi )

 • केळी – 2 हिरव्या जातीची पिकलेली , बारीक काप केलेले
 • थंड दूध – १ १/२ कप
 • साखर किंवा पिठी साखर - १ टेबलस्पून चवीनुसार कमी जास्त करू शकता
 • वेलची पूड - १/२ टीस्पून
 • बदाम सोललेले आणि बारीक काप केलेले - १ १/२ टेबलस्पून
 • सजावटीसाठी - चेरीज

केळ्याचे शिकरण | How to make Banana Shikran Recipe in Marathi

 1. १/४ भाग केळीचे बारीक तुकडे करून घ्या. चमचा किंवा मॅशरचा वापर करून मॅश करा.
 2. एका खोल बाउलमध्ये दूध घ्या. साखर घालावे. साखर वितळेपर्यंत चांगले मिक्स करावे.
 3. त्यात ३/४ भाग पातळ काप केलेली केळी आणि १/४ भाग मॅश केळी घालावे. चांगले ढवळा.
 4. वेलची पूड आणि पातळ काप केलेले बदाम घालून मिक्स करावे. चांगले ढवळा.
 5. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंडगार किंवा तत्काळ सर्व्ह करा.

My Tip:

तयार डिश जास्त वेळे साठी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू नये नाहीतर डिश ची चव बदलेल.शक्य असेल तर पिटी साखर वापरा.थंडगार दूध वापरा

Reviews for Banana Shikran Recipe in Marathi (0)