फणसाचे अप्पे | Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram recipe in Marathi,फणसाचे अप्पे, Sujata Hande-Parab
फणसाचे अप्पेby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फणसाचे अप्पे recipe

फणसाचे अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram Recipe in Marathi )

 • फणस लगदा किंवा पल्प - ३/४ कप (बरक्या फणसाचे गरे, बी कडून घेतलेले आणि मिक्सर ला लावून वाटून घेतलेले)
 • तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ - २-३ टेबलस्पून
 • किसलेला गुळ - १/२ – ¾ कप
 • रवा - १ कप
 • वेलची पूड - १/२ टीस्पून
 • जायफळ पूड - १/४ टीस्पून
 • काजू तुकडे - १-२ टेबलस्पून
 • बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - छोटी चिमूटभर
 • मीठ - छोटी चिमूटभर
 • तूप - १ टेबलस्पून बॅटर साठी + ३-४ टेबलस्पून अप्पे भाजण्यासाठी
 • पाणी - २-३ टेबलस्पून

फणसाचे अप्पे | How to make Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram Recipe in Marathi

 1. रवा चांगला धुऊन गाळून घ्यावा.१०-१५ मिनिटे तसाच ठेवावा.
 2. एका वाडग्यात फणस पल्प किंवा लगदा, रवा, गूळ, वेलची, मीठ आणि जायफळ पूड एकत्र करून घ्यावे.
 3. गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ, तूप, काजू तुकडे टाकून व्यवस्तिथ मिक्स करून घ्यावे. जर लागत असेल तर थोडे पाणी घालावे. मिक्स करावे.
 4. सोडा अगदी शेवटी टाकावा, ढवळून ५ मिनिट बाजूला ठेवून मगच अप्पे काढावेत.
 5. अप्पे पॅन वर तूप टाकून गरम करून घ्यावे. केलेले मिश्रण छोट्या गोल चमच्याने ३/४ टाकून घ्यावे.
 6. मंद आचेवर एका बाजूने भाजून घ्यावे. कडा ब्राउन होऊ लागल्यावर परतून घ्यावे.
 7. तूप सोडून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यावे.
 8. गरमागरम चहा बरोबर सर्व्ह करा.

My Tip:

फणस मध्ये बरका फणस वापरावा.गुळा ऐवजी साखर वापरली वापरली तरी चालते. अप्पे मंद आचेवर भाजावेत अन्यथा करपू शकतात.

Reviews for Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram Recipe in Marathi (0)