BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाचे अप्पे

Photo of Jackfruit Appe or Kuzhi Paniyaram by Sujata Hande-Parab at BetterButter
0
6
0(0)
0

फणसाचे अप्पे

May-31-2018
Sujata Hande-Parab
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाचे अप्पे कृती बद्दल

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि कमी रसवाले किंवा अगदी बेताने रसाळ असतात. कापे गरे टिकाऊ आणि जास्त प्रमाणात खाल्ले जातात. बरके हे रस, फणस पापड, सांदण, इडली, शिरा ह्यामध्ये वापरले जातात. फणस सीझनल फळ असून जण ते मे किंवा जून पर्यंत बाजारात मिळते. महाराष्ट्र, कोंकण आणि पश्चिम मे कडे मोट्या प्रमाणावर वापरले जाते. ह्या रेसिपी मध्ये मी अप्पे हे फणस आणि रवा वापरून केले आहेत. गोडी साठी गुळाचा वापर आणि फ्लेवर साठी वेलची आणि जायफळ वापरले आहे. पटकन केल्या मुले खाण्याचा सोडा वापरला आहे. सोडा अगदी शेवटी टाकावा, ढवळून ५ मिनिट बाजूला ठेवून मगच अप्पे काढावेत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • व्हिस्कीन्ग
 • ब्लेंडींग
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. फणस लगदा किंवा पल्प - ३/४ कप (बरक्या फणसाचे गरे, बी कडून घेतलेले आणि मिक्सर ला लावून वाटून घेतलेले)
 2. तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ - २-३ टेबलस्पून
 3. किसलेला गुळ - १/२ – ¾ कप
 4. रवा - १ कप
 5. वेलची पूड - १/२ टीस्पून
 6. जायफळ पूड - १/४ टीस्पून
 7. काजू तुकडे - १-२ टेबलस्पून
 8. बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - छोटी चिमूटभर
 9. मीठ - छोटी चिमूटभर
 10. तूप - १ टेबलस्पून बॅटर साठी + ३-४ टेबलस्पून अप्पे भाजण्यासाठी
 11. पाणी - २-३ टेबलस्पून

सूचना

 1. रवा चांगला धुऊन गाळून घ्यावा.१०-१५ मिनिटे तसाच ठेवावा.
 2. एका वाडग्यात फणस पल्प किंवा लगदा, रवा, गूळ, वेलची, मीठ आणि जायफळ पूड एकत्र करून घ्यावे.
 3. गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ, तूप, काजू तुकडे टाकून व्यवस्तिथ मिक्स करून घ्यावे. जर लागत असेल तर थोडे पाणी घालावे. मिक्स करावे.
 4. सोडा अगदी शेवटी टाकावा, ढवळून ५ मिनिट बाजूला ठेवून मगच अप्पे काढावेत.
 5. अप्पे पॅन वर तूप टाकून गरम करून घ्यावे. केलेले मिश्रण छोट्या गोल चमच्याने ३/४ टाकून घ्यावे.
 6. मंद आचेवर एका बाजूने भाजून घ्यावे. कडा ब्राउन होऊ लागल्यावर परतून घ्यावे.
 7. तूप सोडून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यावे.
 8. गरमागरम चहा बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर