तिरंगी फ्रूटी जेली | Tricolour Fruity Jelly Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  1st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Tricolour Fruity Jelly recipe in Marathi,तिरंगी फ्रूटी जेली, जयश्री भवाळकर
तिरंगी फ्रूटी जेलीby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

1

तिरंगी फ्रूटी जेली recipe

तिरंगी फ्रूटी जेली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tricolour Fruity Jelly Recipe in Marathi )

 • 4 ग्राम अगर अगर/चाइना ग्रास
 • 1 कप पाणी
 • 1/2 कप कलिंगड़ा ची प्यूरी
 • 1/2 कप कीवी ग्रेवी
 • 2 टेबलस्पून कीवी क्रश
 • 1/2कप आंब्या चा रस

तिरंगी फ्रूटी जेली | How to make Tricolour Fruity Jelly Recipe in Marathi

 1. 4 ग्राम अगर अगर घ्या.
 2. सर्व प्रथम एका पातेलित अगर अगर पाण्यात 10 मिनिटा ला भिजवून ठेवा.
 3. 3 वेगवेगळ्या पॉट मधे कलिंगड़ ची प्यूरी, कीवी ची प्यूरी आणि आंब्या चा रस घ्या.
 4. आता अगर अगर चे पॉट गैस वर ठेवा आणि अगर अगर मेल्ट होई पर्यन्त सतत हालवत रहा .
 5. अगर अगर मेल्ट होई पर्यन्त हालवत गरम करा.
 6. आता अगर अगर गाळून घ्या.
 7. गाळून घेतलेला अगर अगर एका पॉट मधे घ्या .
 8. आता अंदाजे अगर अगर चे 3 भाग करायचे आहे.सर्व प्रथम 1 भाग तरबूजच्या प्यूरी मधे मिक्स करा आणि फ्रीज़र मधे 5 मिनिटा ला सेट व्हायला ठेवा.
 9. आता कीवी च्या प्यूरी मधे 1 टेबलस्पून कीवी क्रश घाला कारण नुसत्या प्यूरी चा हवा तसा हिरवा रंग नाही येत. ह्यात अगर अगर चा दूसरा भाग नीट मिक्स करा. जर अगर अगर थंड होऊन सेट होत असे वाटले तर गैस वर मंद आंचे वर हालवून गरम करा ,हवे तसे लिकविड होईल.
 10. .हे लाल लेयर वर अलगद घाला आणि पुन्हा 5 मिनिटा ला फ्रीज़र मधे सेट व्हायला ठेवा.
 11. आता आंब्या च्या रसात उरलेला अगर अगर चा  3 रा भाग  घाला ,मिक्स करा आणि कीवी च्या लेयर वर घाला.
 12. आता हे तिरंगी जेली फ़्रिज मधे 1/2 तास पूर्ण सेट व्हायला ठेवा.
 13. जेली बाहेर काढून तिचे पीसेस कापा आणि थंड थंड सर्व करा आपली पौष्टिक आणि टेस्टी अशी तिरंगी फ्रूटी जेली तैयार आहे.
 14. आपली बच्चे कंपनी जाम खुश होणारच.

My Tip:

अजून टेस्टी करण्या करता आंब्या च्या रसात काजू बादाम चे काप घाला. मी घेतलेल्या फ्रूट्सच्या ऐवजी दूसरे कोणते ही फळ घेऊशकता

Reviews for Tricolour Fruity Jelly Recipe in Marathi (1)

tejswini dhopte5 months ago

Wow
Reply
जयश्री भवाळकर
5 months ago
Thanks a lot