फणस आइसक्रीम | Jackfruit Icecream Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jackfruit Icecream recipe in Marathi,फणस आइसक्रीम, Sujata Hande-Parab
फणस आइसक्रीमby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  9

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

फणस आइसक्रीम recipe

फणस आइसक्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jackfruit Icecream Recipe in Marathi )

 • फणस पल्प किंवा लगदा - १ वाटी
 • साखर - १ टेबलस्पून
 • कंडेन्सड मिल्क - १ १/४ कप 
 • फूल फॅट क्रीम – २००-२५० ग्राम्स (अमूल किंवा कोणताही फुल फॅट क्रीमचा वापर केला चारी चालेल)
 • वॅनिला इससेन्स - १ टीस्पून
 • चोकोलेट सिरप - सजावटीसाठी - 2 टेबलस्पून

फणस आइसक्रीम | How to make Jackfruit Icecream Recipe in Marathi

 1. बरके गरे बिया काडून वेगळे करावेत.
 2. एका पॅन किंवा टोपा मध्ये घालून त्यात साखर घालून मंद आचेवर ७-१० मिनिटे शिजवून घ्यावेत.
 3. शिजवून झाल्यावर थंड करून, मिक्सर ला लावून त्याची प्युरी किंवा लगदा करून घ्यावा.
 4. फुल फॅट क्रीम रात्रभर फ्रिझर मध्ये ठेवून सकाळी बाहेर काढावी.
 5. आईस बाथ किंवा एका मोठ्या भांड्यात बर्फ घेऊन त्यात दुसरे वाडगे देवावे.
 6. थंड क्रीम घेऊन ती फेटून घट्ट पीक येई पर्यंत फेटून घ्यावी. क्रीम फेटण्यासाटी इलेक्ट्रिक बीटर चा वापर करावा.
 7. एका दुसऱ्या मोट्या वाडग्यात कंडेन्सड मिल्क आणि फणस लगदा घेऊन बीट किंवा मिक्स करावे.
 8. वॅनिला इससेन्स टाकून मिक्स करावे. विप्प्ड क्रीम थोडी थोडी टाकून अलगद फोल्ड करून घ्यावी.
 9. मिश्रण चांगले एकत्रित करून घ्यावे.
 10. नंतर एका फ्रीझर सेफ काचेच्या वाडग्यात (ज्याला झाकण असेल असे) टाकावे.
 11. फ्रीझर मध्ये रात्रभर ठेवून सकाळी किंवा व्यवस्तिथ जमल्यावर चॉकोलेट सिरप टाकून सर्व्ह करा

My Tip:

आइसक्रीम फ्रिझर सेफ हवा बंद काचेच्या बाउल मध्ये व्यवस्तिथ जमते. कापे गऱ्यांचे एकदम बारीक तुकडे आइसक्रीम मध्ये टाकू शकता

Reviews for Jackfruit Icecream Recipe in Marathi (0)