मुख्यपृष्ठ / पाककृती / फणस आइसक्रीम

Photo of Jackfruit Icecream by Sujata Hande-Parab at BetterButter
568
6
0.0(0)
0

फणस आइसक्रीम

Jun-01-2018
Sujata Hande-Parab
540 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणस आइसक्रीम कृती बद्दल

बरक्या गरांचा वापर करून हे आइसक्रीम बनवलेले आहे. बरके गरे हे असेच कमी प्रमाणात खाल्ले जातात. त्या ऐवजी त्याचा वापर करून आइसक्रीम, सांदण, जूस किंवा साठ बनविले जातात. कंडेन्सड मिल्क हे आइसक्रीम ला एक रिच टेस्ट आणि टेक्सचर देते. अतिशय रिच आणि चविष्ट असे आइसक्रीम घरच्या घरी फणसाच्या गऱ्या पासून हि आपण बनवू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 8

  1. फणस पल्प किंवा लगदा - १ वाटी
  2. साखर - १ टेबलस्पून
  3. कंडेन्सड मिल्क - १ १/४ कप 
  4. फूल फॅट क्रीम – २००-२५० ग्राम्स (अमूल किंवा कोणताही फुल फॅट क्रीमचा वापर केला चारी चालेल)
  5. वॅनिला इससेन्स - १ टीस्पून
  6. चोकोलेट सिरप - सजावटीसाठी - 2 टेबलस्पून

सूचना

  1. बरके गरे बिया काडून वेगळे करावेत.
  2. एका पॅन किंवा टोपा मध्ये घालून त्यात साखर घालून मंद आचेवर ७-१० मिनिटे शिजवून घ्यावेत.
  3. शिजवून झाल्यावर थंड करून, मिक्सर ला लावून त्याची प्युरी किंवा लगदा करून घ्यावा.
  4. फुल फॅट क्रीम रात्रभर फ्रिझर मध्ये ठेवून सकाळी बाहेर काढावी.
  5. आईस बाथ किंवा एका मोठ्या भांड्यात बर्फ घेऊन त्यात दुसरे वाडगे देवावे.
  6. थंड क्रीम घेऊन ती फेटून घट्ट पीक येई पर्यंत फेटून घ्यावी. क्रीम फेटण्यासाटी इलेक्ट्रिक बीटर चा वापर करावा.
  7. एका दुसऱ्या मोट्या वाडग्यात कंडेन्सड मिल्क आणि फणस लगदा घेऊन बीट किंवा मिक्स करावे.
  8. वॅनिला इससेन्स टाकून मिक्स करावे. विप्प्ड क्रीम थोडी थोडी टाकून अलगद फोल्ड करून घ्यावी.
  9. मिश्रण चांगले एकत्रित करून घ्यावे.
  10. नंतर एका फ्रीझर सेफ काचेच्या वाडग्यात (ज्याला झाकण असेल असे) टाकावे.
  11. फ्रीझर मध्ये रात्रभर ठेवून सकाळी किंवा व्यवस्तिथ जमल्यावर चॉकोलेट सिरप टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर