मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद खीर पन्ना कोट्टा विथ प्रलाइन

Photo of Apple Kheer Panna Cotta With Praline by Sujata Hande-Parab at BetterButter
623
6
0.0(0)
0

सफरचंद खीर पन्ना कोट्टा विथ प्रलाइन

Jun-01-2018
Sujata Hande-Parab
180 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद खीर पन्ना कोट्टा विथ प्रलाइन कृती बद्दल

हि रेसिपी फूझन रेसिपी आहे. ह्या रेसिपीत सफरचंदाची खीर बनवून त्याचे पन्ना कोटात रूपांतर केलेले आहे. पन्ना कोटा हि एक इटालियन डिश आहे. ती हेवी क्रीम आणि दुधाचा वापर करून तयार केली जाते. रेफ्रिजरेटर मध्ये एकदम थंड करूनच सर्वे करावी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सफरचंद खीर लाल सफरचंद - 1 मध्यम (किसलेले)
  2. बारीक रवा - 1 टेबलस्पून
  3. साखर - 1 1/2 टेबलस्पून. सफरचंदाच्या गोडीनुसार कमी जास्त करा 
  4. तूप - 1 टेबलस्पून
  5. कोमट फुल फॅट दूध - १ १/४ कप + १/४ कप केसर मिक्सर तयार करण्यासाठी 
  6. क्रिम - 2 टेबलस्पून
  7. वेलची पूड - 1/2 टिस्पून
  8. जायफळ पावडर - ¼ टिस्पून
  9. काळा मनुका - 2 चिरून
  10. केशर - 1/2 टीस्पून
  11. व्हेज जिलेटीन - 1टीस्पून
  12. थंड पाणी - 2 टेबलस्पून जिलेटिन फुलवण्यासाठी 
  13. प्रलाइन- साखर -3 टेबलस्पून
  14. लिंबाचा रस - ½ टीस्पून
  15. मनुका - 1 टीस्पून जाडसर कापलेला
  16. सजावटीसाठी - संत्र्याचा लगदा किंवा पलप- १/२ टेबलस्पून
  17. केसर
  18. क्रीम फेटलेली किंवा विप्पड केसर टाकलेली किंवा तशीच - 1 टेबलस्पून
  19. सफरचंदाची साल

सूचना

  1. प्रलाइन साठी - एका पॅनमध्ये साखर घाला. कमी आचेवर वर विरघळू द्या. साखर वितळली जात नाही तोवर ते हलवू नका.
  2. लिंबाचा रस आणि चिरलेली मनुका घाला. ढवळणे. ज्योत बंद करा.
  3. मिश्रण तात्काळ सिलिकॉन चटई किंवा तेल लावून तयार केलेल्या पॅन वर घाला. ते १-२ मिनिटानंतर कडक होईल.
  4. कापा किंवा लहान तुकडे करून घ्या. पन्ना कोटा सजवण्यासाठी वापरा.
  5. केशर दुधाचे मिश्रण - एका लहान वाडग्यात ¼ कप गरम दूध घ्या. केसर घालून चांगले मिक्स करावे.
  6. सफरचंद खीर - गरम पॅन वर बारीक रवा मंद आचेवर सुक्या तपकिरी रंगावर भाजून घ्या. यास ८-९ मिनिटे लागतील.
  7. नॉनस्टिक पॅन वर गरम तूप करून किसलेले सफरचंद घालावे. चांगले मिक्स करावे १ मिनिट शिजू द्या.
  8. भाजलेला रवा घालून मिसळा.
  9. साखर आणि वेलची, जायफळ पावडर घालावी. चांगले मिक्स करावे
  10. कोमट दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. ते नीट ढवळून घ्यावे आणि शिजवावे.
  11. बारीक चिरलेली मनुका, क्रीम टाका. चांगले मिक्स करावे मिश्रण अर्ध घट्ट होईपर्यंत शिजवा. आच बंद करा.
  12. पन्ना कोटा - दुसर्या वाडगामध्ये व्हेज जिलेटिन घ्या. थंड पाणी घाला. 2-3 मिनीटे चांगले मिक्स करावे. चांगले फुलू द्यावे. ब्लेंडरमध्ये हे मिश्रण कडून घ्या.
  13. एका छोटा सौस पॅन किंवा टोपा मध्ये हे जिलेटीन घ्या. काही सेकंदांपर्यंत ढवळत राहावे.
  14. सफरचंद खीर मध्ये टाका. ते एकत्र होईपर्यंत मिसळा. ही प्रक्रिया त्वरीत केली पाहिजे.
  15. हे मिश्रण छोट्या ग्लासेस किंवा वाटीत टाका. त्याला सेट होऊ द्या.
  16. फ्रीजमध्ये ठेवा. संत्र्याचा लगदा किंवा पल्प आणि तयार प्रलाइन ने सजवा.
  17. थंडगार सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर