आंबा दही आईसक्रीम | Mango Curd Icecream Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Curd Icecream recipe in Marathi,आंबा दही आईसक्रीम, Sujata Hande-Parab
आंबा दही आईसक्रीमby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आंबा दही आईसक्रीम recipe

आंबा दही आईसक्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Curd Icecream Recipe in Marathi )

 • हंग दही किंवा चक्का - 1 1/2 कप (दही ४-५ तास कपड्यात बांधून नंतर त्याचा वापर करावा )
 • आंबा पल्प- 1 कप (ताजे, गोड आणि जाड)
 • सुका मेवा - १/४ कप
 • वेलची पूड- 1/2 टीस्पून
 • मध - 2-3 चमचे
 • आंबा बारीक तुकडे - 1/4 कप
 • गार्निशसाठी - मनुका, आंबा पल्प, चॉकलेट सिरप

आंबा दही आईसक्रीम | How to make Mango Curd Icecream Recipe in Marathi

 1. आंबा पल्प किंवा घट्ट रस - आंबे धुवून घ्या, तुकडे करून घ्या, मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत ते वाटून घ्या.
 2. टांगलेले दहीसाठी - मळमळ च्या कापडात ताजे दही ३-४ तास टांगून ठेवा.
 3. एका वाडग्यात आंबा पल्प घ्या. चक्क किंवा टांगून घट्ट केलेले दही घाला. एकदम क्रीमि किंवा नरम होईपर्यंत विस्क किंवा फेटून घ्या.
 4. मध आणि वेलची पूड घालावी. चांगले मिक्स करावे. सुका मेवा आणि आंब्यांचे तुकडे घालावे.
 5. हळू एकत्र करावे.
 6. हवा बंद डब्यात किंवा काचेच्या वाडग्यात (झाकण असलेल्या) घालून डीप फ्रीजरमध्ये ठेवा.
 7. 45 मिनिटांनी डबा बाहेर कडून आइस्क्रीम मिश्रण व्यवस्तिथ ढवळून घ्या. हे आइसक्रीम ला सॉफ्ट क्रीमि होण्यास मदत करते.
 8. प्रतेय्क 45 मिनिटानंतर ३-४ वेळा हे परत करा. आइसक्रीम जमण्यास ६-७ तास किंवा रात्रभर ठेवा.
 9. मनुकांनी, चॉकोलेट सिरप ने सजवा . थंडगार सर्व्ह करावे.

My Tip:

आइसक्रीम फ्रिझर सेफ हवा बंद काचेच्या बाउल मध्ये व्यवस्तिथ जमते. ताज्या रसाळ गोड आंब्यांचा वापर करा.

Reviews for Mango Curd Icecream Recipe in Marathi (0)