केळे सुकामेवा मोदक | Banana Dry fruits Modak Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  2nd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Banana Dry fruits Modak recipe in Marathi,केळे सुकामेवा मोदक, Sujata Hande-Parab
केळे सुकामेवा मोदकby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

केळे सुकामेवा मोदक recipe

केळे सुकामेवा मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Dry fruits Modak Recipe in Marathi )

 • कच्चे केळे सालीसह - २
 • मध - 3-4 टेबलस्पून + २ टेबलस्पून सारणासाठी (आपल्या गरजेनुसार गोड कमी जास्त करा.)
 • वॅनिला इससेन्स - ½ टीस्पून
 • किसलेला सोललेला सुक्का नारळ किंवा डेसिकेटेड - 1/4 कप कप + २ टेबलस्पून घोळवण्यासाठी 
 • भाजलेले बदाम -२ टेबलस्पून 
 • भाजलेले काजू - २ टेबलस्पून 
 • बारीक चिरलेली मनुका - २ टीस्पून
 • तूप - १/२ टेबलस्पून 
 • सजावटीसाठी - काजू, मनुका,किसलेले सुखे खोबरे.

केळे सुकामेवा मोदक | How to make Banana Dry fruits Modak Recipe in Marathi

 1. केळी मध्ये सुरीने छोटे छोटे कट करून घ्या. तूप लावा आणि मायक्रोवेव्ह मध्ये ५-७ मिनिटे किंवा नरम होईपर्यंत शिजवून घ्या. साले काढू नका.
 2. किसलेला सुका नारळ किंवा डेसिकेटेड नारळ थोडा भाजून घ्या. जास्त लाल करू नका.
 3. थंड झाल्यावर केळे सालीसह मिक्सर ला वाटून घ्या.
 4. त्यात भाजेला किसलेला सुका नारळ, मध आणि व्हॅनिला इससेन्स टाकून परत मिक्सर ला लावून घ्या. जास्त बारीक पेस्ट करू नका.
 5. कढईत तूप गरम करावे. केळी आणि किसलेला सुका नारळाचे मिश्रण घाला. 2-3 मिनीटे शिजवावे ज्योत बंद करा त्याला थंड होऊ द्या.
 6. सारण - भाजलेले बादाम आणि काजू जाडसर वाटून घ्यावे. पीठ बनवू नये. थोडे रवाळ ठेवावे.
 7. दुसऱ्या वाडग्यात सुका मेवा जाड मिश्रण, बारीक कापलेली मनुका आणि मध मिसळावा. बाजूला ठेवा.
 8. मोदक साठी - केळीच्या नारळाच्या मिश्रणा चे १/२ इंच लहान पेअर आकारातील गोळे बनवा.
 9. ते तूप लावलेल्या मोदक मोल्ड मध्ये घाला. हाताचा अंगठा वापरून व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी प्रेस किंवा दाबून मध्ये पोकळी करून घ्या.
 10. बनिवलेले सुका मेवा सारण १ १/२ टीस्पून पोकळीत भरून घ्या.
 11. एक केळे-नारळ मिश्रणाची छोटी डिस्क किंवा गोल चकती करून घ्या.
 12. मोदकाची खालची बाजू वर हि चकती ठेववून व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
 13. राहिलेल्या केळी नारळाच्या मिश्रणा बरोबर प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
 14. एका प्लेटमध्ये भाजलेला किसलेला सुका नारळ किंवा डेसिकेटेड नारळ पसरावा.
 15. बनवले मोदक सर्व बाजूनी चांगले कोट करून घ्या.
 16. गार्निश करा आणि सर्व्ह करावे.

My Tip:

सुका मेवा सारणात वॅनिला इससेन्स चा वापर करू शकता मधा ऐवजी खजूर किंवा मॅपल सिरप वापरू शकता.

Reviews for Banana Dry fruits Modak Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo