मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल सफरचंदाची खीर

Photo of Red Apple Kheer by Sujata Hande-Parab at BetterButter
733
6
0.0(0)
0

लाल सफरचंदाची खीर

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल सफरचंदाची खीर कृती बद्दल

ह्या रेसिपीत मी लाल सफरचंदाचा वापर केला आहे. लाल सफरचंद आणि रवा ह्यापासून बनवलेली हि खीर खूप पौस्टिक आहे . लहानांपासून मोट्यानाही आवडेल अशी हि रेसिपी पटकन होते. क्रीम चा वापर खिरीचा रिचनेस वाढविण्यासाठी केला आहे. क्रीम ने खीर आणखीन चविष्ट आणि क्रीमि होते. गरम गरम किंवा थंडगार सर्व्ह करू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल सफरचंद - 1 मध्यम (किसलेले)
  2. बारीक रवा - 1 टेबलस्पून
  3. तूप - 1 टेबलस्पून
  4. केशर - 1/2 टीस्पून
  5. साखर - 1-2 टेबलस्पून. सफरचंदाच्या गोडीनुसार कमी जास्त करा 
  6. कोमट फुल फॅट दूध - १ १/४ कप + १/४ कप केसर मिक्सर तयार करण्यासाठी
  7. क्रिम - 2 टेबलस्पून
  8. वेलची पूड - 1/2 टिस्पून
  9. जायफळ पावडर - ¼ टिस्पून
  10. काळा मनुका - 2 अंदाजे चिरून
  11. काजू तुकडे - १ टेबलस्पून

सूचना

  1. गरम पॅन वर बारीक रवा मंद आचेवर सुक्या तपकिरी रंगावर भाजून घ्या. यास ८-९ मिनिटे लागतील.
  2. नॉनस्टिक पॅन वर गरम तूप करून किसलेले सफरचंद घालावे. चांगले मिक्स करावे १ मिनिट शिजू द्या.
  3. भाजलेला रवा घालून मिसळा.
  4. साखर आणि वेलची, जायफळ पावडर घालावी. चांगले मिक्स करावे
  5. कोमट दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. ते नीट ढवळून घ्यावे आणि शिजवावे.
  6. बारीक चिरलेली मनुका, काजू तुकडे, क्रीम टाका. चांगले मिक्स करावे .
  7. थंडगार सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर