कैरीचे पन्हे | Kairiche panhe Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kairiche panhe recipe in Marathi,कैरीचे पन्हे, Pranali Deshmukh
कैरीचे पन्हेby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

कैरीचे पन्हे recipe

कैरीचे पन्हे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairiche panhe Recipe in Marathi )

 • चार कैऱ्या
 • 2 वाटी साखर
 • 2 वाटी गूळ
 • मीठ
 • वेलची पूड 1 tbs

कैरीचे पन्हे | How to make Kairiche panhe Recipe in Marathi

 1. कैरी धुवून कुकरला ३ शिटया करून उकडून घ्यावी
 2. नंतर तिचा गर काढावा २ वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ व २ वाटी साखर घालावी .
 3. साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्यावे,कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण ठरवावे.
 4. १/२ चमचा मीठ घालावे . एका पातेल्यात गर,गूळ,साखर,मीठ एकत्र करून गॅसवर ठेवून त्याला एक चटका द्यावा. गार झाल्यावर डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावे.
 5. प्रत्येकवेळी पन्ह करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे .चवीप्रमाणे मीठ,वेलची पूड घालावी. मस्त थंडगार पन्हं तयार.

Reviews for Kairiche panhe Recipe in Marathi (0)