केळी द्राक्षे पुडिंग | Banana grapes Pudding Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana grapes Pudding recipe in Marathi,केळी द्राक्षे पुडिंग, Sujata Hande-Parab
केळी द्राक्षे पुडिंगby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

केळी द्राक्षे पुडिंग recipe

केळी द्राक्षे पुडिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana grapes Pudding Recipe in Marathi )

 • रवा - 1/2 कप
 • साखर - ३-४ टेबलस्पून चवीनुसार कमी जास्त करा.
 • वेलची केळी - 3
 • हिरवी द्राक्षे - 5-6 (तसेच काळीही वापरू शकता) स्लाईस केलेली
 • तूप - 2-3 चमचे
 • क्रिम - १/२ कप
 • दूध - 1 कप
 • काजू - 3-4 बारीक चिरून
 • बदाम - 3-4 बारीक चिरून
 • वेलची ची पूड - ½ टीस्पून
 • जायफळ पावडर - ¼ टीस्पून
 • हळद - ¼ टीस्पून (हळद ऐवजी पिवळी खाण्याचा रंग वापरता येतो)
 • आवश्यक असल्यास गरम पाणी
 • केसर धागे - 5-6
 • सजावटीसाठी चॉकोलेट सिरप

केळी द्राक्षे पुडिंग | How to make Banana grapes Pudding Recipe in Marathi

 1. रवा मंद आचेवर लाल रंगावर भाजून घ्यावा. त्याला 8-10 मिनिटे लागतील.
 2. कढईत तूप गरम करून घ्यावे. भाजलेला रवा घ्यावा. मॅश केलेले केळी घालून चांगले मिक्स करावे.
 3. बारीक कापलेले काजू, बदाम घालणे. चांगले मिक्स करावे वेलची, जायफळ पावडर, साखर, केसर टाकून घ्या. नीट ढवळून घ्यावे
 4. दूध आणि क्रीम टाका. मिश्रण एकत्र होईपर्यंत ढवळा. अर्धे मिश्रण वेगळे काढुन घ्या.
 5. एका दुसऱ्या पण मध्ये थोडेसे तूप टाकून त्यात हळद टाकून १५ सेकंड भाजून घ्या. अर्धे रव्याचे मिश्रण टाका आणि चांगले एकत्रित होईपर्यंत ढवळा.
 6. दोन्ही मिश्रण ४-5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. गरजेनुसार गरम पाणी घालावे.
 7. एक मफिन मोल्ड किंवा साचा घ्या. तयार केलेले पुडींग किंवा शिरा घाला अर्धा वर आणि अर्धा खाली ठेवा. चांगले दाबून घ्या.
 8. १ मिनिट ठेवा आणि नंतर ते एका ताटात पालटून घ्या. मल्टीकलर पुडींग तयार आहे.
 9. काजू, द्राक्ष काप, केसर आणि चॉकलेट सिरप टाकून सजवून घ्या.
 10. गरम सर्व्ह करा.

My Tip:

रवा भाजणे व्यवस्थित केले पाहिजे.अंडरकुक्कड अर्धा कच्चा रवा डिशची चव बिघडवू शकतो. गोड हवा असल्यास साखर प्रमाण वाढवा.

Reviews for Banana grapes Pudding Recipe in Marathi (0)