फळांचा पॅनकेक | Fruit Pancake Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruit Pancake recipe in Marathi,फळांचा पॅनकेक, Sujata Hande-Parab
फळांचा पॅनकेकby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फळांचा पॅनकेक recipe

फळांचा पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit Pancake Recipe in Marathi )

 • तूप - २ टेबलस्पून + २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
 • साखर - १ १/२ टेबलस्पून
 • केळी पल्प - ३ टेबलस्पून
 • सफरचंद प्युरी किंवा घट्ट रस - ३/४ कप
 • दालचिनी पावडर - १ १/२ टीस्पून 
 • दूध - १ कप
 • गव्हाचे पीठ - ३/४ कप
 • मैदा - ३ टेबलस्पून
 • मीठ - १/४ टीस्पून
 • बेकिंग पावडर - २ टीस्पून
 • सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी - मध - २-३ टेबलस्पून
 • डाळिंबाचे दाणे - १-३ टेबलस्पून 

फळांचा पॅनकेक | How to make Fruit Pancake Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात तूप आणि साखर चांगली फेटून घ्यावी.
 2. नंतर त्यात केळी पल्प, सफरचंद प्युरी,दालचिनी पावडर आणि १/२ कप दूध टाकून चांगले विस्क किंवा फेटून घ्यावे. हाताच्या विस्कर चा वापर करावा.
 3. मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ चाळून घ्यावे.
 4. नंतर ते बनवलेल्या केळी-सफरचंद मिश्रणात टाकावे. मिक्स करावे.
 5. राहिलेले दूध टाकून हळू हळू व्यवस्तीत ढवळून घावे. जास्त ढवळू नये.
 6. एका नॉन स्टिक पॅन मध्ये तूप पसरवून घ्यावे. त्यावर एका छोट्या चमच्याने तर मिश्रण पसरवावे आणि त्याचे छोटे छोटे गोल आकार करून घ्यावेत.
 7. एका बाजूने भाजल्यावर पलटी करून थोडे तूप टाकावे.
 8. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्तीत भाजून घ्यावे. आंच मंद असावी नाहीतर पॅनकेक करपू शकतात.
 9. मध आणि डाळिंबाचे दाणे टाकून गरमा गरम सर्व्ह करावे.

My Tip:

मधाऐवजी मॅपल सिरप चा वापर आणि विविध फळाबरोबर हे सर्व्ह करू शकता

Reviews for Fruit Pancake Recipe in Marathi (0)