मुख्यपृष्ठ / पाककृती / फळांचा पॅनकेक

Photo of Fruit Pancake by Sujata Hande-Parab at BetterButter
249
7
0(0)
0

फळांचा पॅनकेक

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फळांचा पॅनकेक कृती बद्दल

हि रेसिपी फळाची प्युरी किंवा रस वापरून केली आहे. आपल्या आवडीनुसार फळे टाकून हि डिश केली जाऊ शकते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युरोपिअन
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूप - २ टेबलस्पून + २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
  2. साखर - १ १/२ टेबलस्पून
  3. केळी पल्प - ३ टेबलस्पून
  4. सफरचंद प्युरी किंवा घट्ट रस - ३/४ कप
  5. दालचिनी पावडर - १ १/२ टीस्पून 
  6. दूध - १ कप
  7. गव्हाचे पीठ - ३/४ कप
  8. मैदा - ३ टेबलस्पून
  9. मीठ - १/४ टीस्पून
  10. बेकिंग पावडर - २ टीस्पून
  11. सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी - मध - २-३ टेबलस्पून
  12. डाळिंबाचे दाणे - १-३ टेबलस्पून 

सूचना

  1. एका वाडग्यात तूप आणि साखर चांगली फेटून घ्यावी.
  2. नंतर त्यात केळी पल्प, सफरचंद प्युरी,दालचिनी पावडर आणि १/२ कप दूध टाकून चांगले विस्क किंवा फेटून घ्यावे. हाताच्या विस्कर चा वापर करावा.
  3. मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ चाळून घ्यावे.
  4. नंतर ते बनवलेल्या केळी-सफरचंद मिश्रणात टाकावे. मिक्स करावे.
  5. राहिलेले दूध टाकून हळू हळू व्यवस्तीत ढवळून घावे. जास्त ढवळू नये.
  6. एका नॉन स्टिक पॅन मध्ये तूप पसरवून घ्यावे. त्यावर एका छोट्या चमच्याने तर मिश्रण पसरवावे आणि त्याचे छोटे छोटे गोल आकार करून घ्यावेत.
  7. एका बाजूने भाजल्यावर पलटी करून थोडे तूप टाकावे.
  8. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्तीत भाजून घ्यावे. आंच मंद असावी नाहीतर पॅनकेक करपू शकतात.
  9. मध आणि डाळिंबाचे दाणे टाकून गरमा गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर