सफरचंद पाई | Apple pie Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Apple pie recipe in Marathi,सफरचंद पाई, Aarti Nijapkar
सफरचंद पाईby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

सफरचंद पाई recipe

सफरचंद पाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple pie Recipe in Marathi )

 • मैदा २ १/२ कप
 • बटर थंड १८० ग्रॅम
 • साखर ३ मोठे चमचे
 • मीठ चिमूटभर
 • दूध २ मोठे चमचे किंवा आवश्यकता असल्यास
 • पाई च मिश्रण
 • सफरचंद २ ते ३
 • साखर ३/४ कप
 • मध २ मोठे चमचे
 • बदामाचे काप १ मोठा चमचा
 • काजू तुकडे १ मोठा
 • अक्रोड १ मोठा चमचा
 • मनुके १ मोठा चमचा
 • तयार वनीला स्पॉंज १ कप
 • दालचिनी पावडर १ लहान चमचा
 • टोपिंग साठी
 • सफरचंद २ पातळ कापलेले
 • मध २ मोठे चमचे
 • साखर भुरभुरण्यासाठी

सफरचंद पाई | How to make Apple pie Recipe in Marathi

 1. १८०*से वर ओवन तापवून घ्या 
 2. प्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या 
 3. मग मीठ , साखर , फ्रोजन बटर , बेकिंग पावडर एकत्र करून घ्या 
 4. मग बटर आणि मैदा एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या 
 5. दूधाची आवश्यकता असल्यास दूध घालावे
 6. मळून झाल्यावर गोळा करून थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावे
 7. मग गोलाकार लाटून टाटच्या मोल्डवर घालून दाबून जास्तीच पीठ काढावे
 8. मग टोचाच्या चमच्याने टोचे पाडून घ्या त्यामुळे टार्ट फुगणार नाही  ओवन मध्ये टाट १८०* से वर १० ते १२ मि. बेक करुन घ्या  थंड करण्यास ठेवून द्या 
 9. पाई च्या मिश्रणा करिता
 10. सफरचंदाचे तुकडे साल काढून घ्या
 11. एका भांड्यात बटर घाला त्यात सफरचंदाचे तुकडे परतवून घ्या मग त्यात सर्व ड्राय फ्रुटस घालून परतवून घ्या
 12. साखर व मध घालून घ्या मिश्रण एकत्र करून घ्या पाणी सुटेल ते सुकेपर्यंत परतवून घ्या
 13. मग दालचिनी पावडर घाला व वेनीला स्पॉंज चा चुरा करा व मिश्रणात घाला सर्व एकजीव करून घ्या
 14. गॅस बंद करून घ्या
 15. आता हे मिश्रण बेक केलेल्या टार्ट मध्ये घाला व्यवस्थित पसरवुन घाला
 16. मग त्यावर सफरचंदाचे काप गोलाकार ठेवून द्या
 17. सफरचंद वर सर्वत्र साखर भुरभुरा (बारीक साखर)
 18. ओव्हन मध्ये १८०* से वर १० मिनिटे बेक करा
 19. बेक झाल्यावर त्यावर मध घाला
 20. आता सफरचंद पाई तयार आहे
 21. गरमागरम किंवा थंड खाऊ शकतो

My Tip:

सफरचंद पाई मध्ये आपण हिरवे सफरचंद सुध्दा वापरू शकतो चवीला आंबट गोड लागते

Reviews for Apple pie Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow
Reply
Aarti Nijapkar
6 months ago
Tysm