मैंगो कोफ्ता फर्जीतो | Mango kofta fajito Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Mango kofta fajito recipe in Marathi,मैंगो कोफ्ता फर्जीतो, Rohini Rathi
मैंगो कोफ्ता फर्जीतोby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

मैंगो कोफ्ता फर्जीतो recipe

मैंगो कोफ्ता फर्जीतो बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango kofta fajito Recipe in Marathi )

 • फर्जीतो साठी
 • आंब्याचा रस अर्धा कप
 • ताक एक कप
 • बेसन पीठ तीन टेबल
 • लाल मिरची अर्धा टीस्पून
 • हळदी चिमटीभर
 • मीठ चवीनुसार
 • तेल एक टेबलस्पून
 • जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
 • कोफ्ते बनवण्यासाठी
 • आंब्याचा रस 1/4 कप
 • बेसन पीठ अर्धा कप
 • लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
 • हळद चिमुटभर
 • तेल कोफ्ते तळण्यासाठी
 • मीठ चवीनुसार

मैंगो कोफ्ता फर्जीतो | How to make Mango kofta fajito Recipe in Marathi

 1. कोफ्ते बनवण्यासाठी बेसन पीठ आंब्याचा रस मीठ लाल मिरची पावडर घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
 2. तयार पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून कोफ्ते तयार करून घ्यावेत
 3. कढईत तेल गरम करून कोफ्ते लालसर तळून घ्यावेत
 4. फर्जीतो बनवण्यासाठी
 5. ताक आंब्याचा रस मी बेसन पीठ लाल मिरची घालून मिश्रण बनवून घ्यावेत
 6. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालून हिरवी मिरची घालून द्यावी
 7. तयार ताकाचे मिश्रण घालून चमच्याने हलवून घ्यावे
 8. चवीनुसार मीठ घालून घ्यावे
 9. उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
 10. सर्विंग बाउलमध्ये फजीता काढून त्यात कोफ्ते घालून पोळी व भाताबरोबर वाढा.

My Tip:

कोफ्ते बनवताना त्यात थोडेसे तेल घातले चारकोप ते अधिक स्वादिष्ट लागतात

Reviews for Mango kofta fajito Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply