मिश्र फळांचा केक | Mix Fruits Cake Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  3rd Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Mix Fruits Cake recipe in Marathi,मिश्र फळांचा केक, Aarti Nijapkar
मिश्र फळांचा केकby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

2

मिश्र फळांचा केक recipe

मिश्र फळांचा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Fruits Cake Recipe in Marathi )

 • स्पॉंज बनविण्यासाठी
 • मैदा १०० ग्रॅम
 • बेकिंग पावडर १/२ छोटा चमचा
 • बेकिंग सोडा १/४ छोटा चमचा
 • बटर ६० ग्रॅम
 • कंडेस्ड मिल्क २०० मिली
 • फळांचा इसेन्स १ लहान चमचा
 • फ्रुट सॉल्ट वॉटर १०० मिली
 • केक साठी
 • साखरेचं पाणी स्पॉंज वर टाकायला
 • व्हीप्ड क्रीम २५० ग्रॅम
 • पपई
 • सफरचंद
 • किवी
 • संत्र
 • ताजी चेरी
 • डार्क चॉकलेट सजावट साठी

मिश्र फळांचा केक | How to make Mix Fruits Cake Recipe in Marathi

 1. प्रथम ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा प्रिहिट करा
 2. केक च्या टिन ला तेल ग्रीस करून बटर पेपर लावा व पेपरच्या वर पुन्हा ग्रीस करा बाजूला ठेवून द्या
 3. मैदा , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर , चाळून घ्या व एका भांड्यात ठेवा
 4. आता एका भांड्यात बटर बीट करून घ्या क्रीम झाले की त्यात कंडेस्ड मिल्क घालून व्यवस्थित बीट करूम घ्या फळांचा इसेन्स घाला व मिश्रण एकत्र करून घ्या
 5. मैद्याचं मिश्रण क्रीम मध्ये घाला व पुन्हा बीट करून घ्या
 6. आता १ चमचा फ्रुट सॉल्ट मध्ये १०० मिली पाणी घाला व एकत्र करून केक च्या मिश्रणात घाला व रबर स्पॅचुलाने मिश्रण एकजीव करून घ्या
 7. केक ची मिश्रण व्यवस्थित झाल्यावर ग्रीस केलेल्या टिन मध्ये केक चे मिश्रण घाला आणि १८० * से ३० ते ३५ मिनिटे बेक करा
 8. बेक झाल्यावर स्पॉंज ओव्हन च्या जाळीवर ठेवून द्या गार होण्याकरिता
 9. बेक झालेला केक पूर्णपणे गार करून घ्या
 10. आता फळे आवडीनुसार पातळ कापून घ्या
 11. व्हीप्ड क्रीम बीट करून घ्या
 12. सफरचंद व चेरी बारीक कापून घ्या केकच्या लेअर मध्ये घालण्यासाठी
 13. साखरेचं पाणी घ्या गरम पाण्यात साखर घालून विरघळेपर्यंत ढवळत राहा मग गॅस बंद करून गार करून घ्या
 14. एक स्पॉंज चा भाग घ्या त्यावर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग व्हीप्ड क्रीम पसरवा त्यावर बारीक कापलेले सफरचंद व चेरी पसरवून घाला
 15. दुसरा स्पॉंज चा भाग घेऊन पुन्हा वरील कृती करा
 16. आता तिसरा स्पॉंज चा भाग ठेवा त्यावर साखरेचं पाणी शिंपडा फक्त क्रीम लावून घ्या वरच्या बाजूने व सर्वीकडे क्रीम लावून घ्या
 17. आपण ह्या क्रियेला आयसिंग असे म्हणतो
 18. आयसिंग झाल्यावर केक १० मिनिटे फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवून द्या
 19. फ्रुट जेल मध्ये थोडं अननस इमलशन घाला जेल व्यवस्थित एकत्र करून घ्या केक वर पसरवून घ्या
 20. आता त्यावर कापलेली फळे लावून घ्या
 21. फळे काळी पडू नये किंवा सुकू नये म्हणून फ्रुट जेल चा वापर करू शकतो
 22. फळ लावून झाले की केक पुन्हा फ्रीज मध्ये ठेवून द्या
 23. आता बाजूला आपण डार्क चॉकलेट ची पट्टी लावली आहे
 24. तर डार्क चॉकलेट विरघळवून घ्या बटर पेपर त्या मापाचं कापून घ्या
 25. विरघळलेले चॉकलेट बटर पेपर चा कोन बनवून त्यात घाला व पट्टी वर रेघा मारून घ्या
 26. थोडा सेकंद ठेवा थोडं सेट झाल की केकच्या बाजूने ती पट्टी लावा थोडंस दाबा
 27. केक फ्रीज मध्ये ठेवा काहीवेळाने कडून बटर पेपर ची पट्टी काढून घ्या
 28. आता मिश्र फळांचा केक तयार आहे

My Tip:

किवीच्या मधला भाग काढून टाकावे कारण काही वेळाने ते कडू होते व केक ची चव बदलून जाते

Reviews for Mix Fruits Cake Recipe in Marathi (2)

Nayana Palav6 months ago

Excellent
Reply
Aarti Nijapkar
6 months ago
Tysm

Pranali Deshmukh6 months ago

अप्रतिम
Reply
Aarti Nijapkar
6 months ago
Tysm