Photo of Lychee Forest Cake by Aarti Nijapkar at BetterButter
1231
6
0.0(1)
0

Lychee Forest Cake

Jun-03-2018
Aarti Nijapkar
35 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. स्पॉंज बनविण्यासाठी
  2. मैदा १०० ग्रॅम
  3. बेकिंग पावडर १/२ छोटा चमचा
  4. बेकिंग सोडा १/४ छोटा चमचा
  5. बटर ६० ग्रॅम
  6. कंडेस्ड मिल्क २०० मिली
  7. फळांचा इसेन्स १ लहान चमचा
  8. फ्रुट सॉल्ट वॉटर १०० मिली
  9. केक साठी 
  10. साखरेचं पाणी स्पॉंज वर टाकायला
  11. व्हीप्ड क्रीम २५० ग्रॅम
  12. ताजी चेरी 
  13. ताजी लिची
  14. डार्क चॉकलेट सजावट साठी
  15. फ्रुट जेल फळांना लावण्यासाठी

सूचना

  1. प्रथम ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा 
  2. केक च्या टिन ला तेल ग्रीस करून बटर पेपर लावा व पेपरच्या वर पुन्हा ग्रीस करा बाजूला ठेवून द्या
  3. मैदा , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर , चाळून घ्या व एका भांड्यात ठेवा
  4. आता एका भांड्यात बटर बीट करून घ्या क्रीम झाले की त्यात कंडेस्ड मिल्क घालून व्यवस्थित बीट करूम घ्या फळांचा इसेन्स घाला व मिश्रण एकत्र करून घ्या
  5. मैद्याचं मिश्रण क्रीम मध्ये घाला व पुन्हा बीट करून घ्या
  6. आता १ चमचा फ्रुट सॉल्ट मध्ये १०० मिली पाणी घाला व एकत्र करून केक च्या मिश्रणात घाला व रबर स्पॅचुलाने मिश्रण एकजीव करून घ्या
  7. केक ची मिश्रण व्यवस्थित झाल्यावर ग्रीस केलेल्या टिन मध्ये केक चे मिश्रण घाला आणि १८० * से ३० ते ३५ मिनिटे बेक करा
  8. बेक झाल्यावर स्पॉंज ओव्हन च्या जाळीवर ठेवून द्या गार होण्याकरिता
  9. बेक झालेला केक पूर्णपणे गार करून घ्या
  10. व्हीप्ड क्रीम बीट करून घ्या
  11. लिची व चेरी बारीक कापून घ्या केकच्या लेअर मध्ये घालण्यासाठी
  12. साखरेचं पाणी घ्या गरम पाण्यात साखर घालून विरघळेपर्यंत ढवळत राहा मग गॅस बंद करून गार करून घ्या
  13. एक स्पॉंज चा भाग घ्या त्यावर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग व्हीप्ड क्रीम पसरवा त्यावर बारीक कापलेले लिची व चेरी पसरवून घाला
  14. दुसरा स्पॉंज चा भाग घेऊन पुन्हा वरील कृती करा
  15. आता तिसरा स्पॉंज चा भाग ठेवा त्यावर साखरेचं पाणी शिंपडा फक्त क्रीम लावून घ्या वरच्या बाजूने व सर्वीकडे क्रीम लावून घ्या
  16. आपण ह्या क्रियेला आयसिंग असे म्हणतो
  17. आयसिंग झाल्यावर केक १० मिनिटे फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवून द्या
  18. आता केक बाहेर काढून त्यावर ताजी लिची व चेरी लावून घ्या 
  19. फळे काळी पडू नये किंवा सुकू नये म्हणून फ्रुट जेल चा वापर करू शकतो
  20. आता बाजूला आपण डार्क चॉकलेट ची पट्टी लावली आहे
  21. विरघळलेले चॉकलेट बटर पेपर चा कोन बनवून त्यात घाला व पट्टी वर रेघा मारून घ्या 
  22. थोडा सेकंद ठेवा थोडं सेट झाल की केकच्या बाजूने ती पट्टी लावा थोडंस दाबा
  23. केक फ्रीज मध्ये ठेवा काहीवेळाने काढून बटर पेपर ची पट्टी काढून घ्या
  24. आता लिची केक तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Innovative

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर