आवळा कॅण्डी | Aavala candi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aavala candi recipe in Marathi,आवळा कॅण्डी, Pranali Deshmukh
आवळा कॅण्डीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आवळा कॅण्डी recipe

आवळा कॅण्डी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aavala candi Recipe in Marathi )

 • 1 की आवळे
 • 1 की साखर
 • 100 gr.पिठी साखर

आवळा कॅण्डी | How to make Aavala candi Recipe in Marathi

 1. आवळे स्वच्छ धुऊन घ्यावे.पातेल्यात २-३ लिटर पाणी उकळून घ्यावे, उकळले की लगेच त्यात आवळे घालावेत .५ मि. उकळू द्यावेत.
 2. नतर चाळणीत काढून पाणी पूर्ण जाउ द्यावे
 3. त्याचे फोडी वेगळ्या करुन साखर घालावी. नीट मिक्स करावे
 4. ४दिवस तसेच झाकण देउन ठेवावे. ह्या साठी काचेचे भांडे वापरावे. दर दिवशी मधून मधून वर खाली चमच्याने करावेत. ४ दिवसानंतर साखरेच्या पाकातून गाळून घ्यावे.
 5. ताटात किंवा प्लॅस्टिक पेपरवर ऊन्हात वाळत घालावेत . खूप कडक ऊन असेल तर २ दिवसात सूकतात.
 6. १०० पीठीसाखरेत घोळवून बरणीत भरुन ठेवा.
 7. आवळ्यात साखर टाकल्यावर दुसऱ्या दिवशीच साखरेचे पाणी होते.
 8. तो राहिलेला पाक आवळा सरबतासाठी पण वापरु शकतो .

Reviews for Aavala candi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती