पायनॅपल हलवा | Paynapal halva Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paynapal halva recipe in Marathi,पायनॅपल हलवा, Pranali Deshmukh
पायनॅपल हलवाby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

पायनॅपल हलवा recipe

पायनॅपल हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paynapal halva Recipe in Marathi )

 • 2 कप अननसाचे तुकडे
 • 100 gr.खवा
 • 1 पाव साखर
 • 1/4 कप पाणी
 • 4-5 थ्रेड केशर ऐच्छिक
 • 4-5 काजू बदाम
 • 2 tbs तूप

पायनॅपल हलवा | How to make Paynapal halva Recipe in Marathi

 1. साखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा.
 2. पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे.
 3. मंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे. गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे.
 4. अननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते.
 5. दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे.
 6. खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे.
 7. ३-४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे सर्व्ह करतांना काजू-बदामाचे काप घालावे.

Reviews for Paynapal halva Recipe in Marathi (0)