मुख्यपृष्ठ / पाककृती / जांभळाचे सरबत

Photo of Jambhalache sarbat by Pranali Deshmukh at BetterButter
518
1
0.0(0)
0

जांभळाचे सरबत

Jun-03-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जांभळाचे सरबत कृती बद्दल

उन्हाळा￰ संपला आणि पावसाची चाहूल लागली कि मस्त टपोरी काळी जांभूळ येतात .जांभूळ खाल्यावर जीभही रंगते मला हा जांभळा रंग खूप आवडतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 30 मोठी टपोरी जांभूळ
  2. 1 tbs लिंबाचा रस
  3. 2 वाटी साखर
  4. बर्फाचे तुकडे

सूचना

  1. स्वच्छ धुतलेली जांभळं एका पातेल्यात घ्यावीत. अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
  2. मध्यम आचेवर जांभळे ३-४ मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल.
  3. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा.
  4. हा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी.
  5. साखर भिजेल इतके पाणी घेउन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा.
  6. पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे.
  7. गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर