सोलकढी | Solakadhi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Solakadhi recipe in Marathi,सोलकढी, Pranali Deshmukh
सोलकढीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

सोलकढी recipe

सोलकढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Solakadhi Recipe in Marathi )

 • ताज्या नारळाचं दुध २ कप
 • ४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
 • १ हिरवी मिरची
 • १ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
 • १-२ लसूण पाकळ्या
 • १/२ टीस्पून साखर मीठ

सोलकढी | How to make Solakadhi Recipe in Marathi

 1. कप ताज्या खोब-याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा.
 2. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा.
 3. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं
 4. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या.
 5. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.
 6. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा
 7. नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला
 8. लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.

Reviews for Solakadhi Recipe in Marathi (0)