मुख्यपृष्ठ / पाककृती / खरबुज जेली

Photo of Muskmelon jelly by Sujata Hande-Parab at BetterButter
751
5
0.0(0)
0

खरबुज जेली

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
70 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरबुज जेली कृती बद्दल

विविध प्रकारच्या फळांपासून जेली बनवता येतात. ह्या रेसिपीत मी खरबुज रस वापरून जेली बनिवलेली आहे. आईसक्रीम बरोबर हि अतिशय स्वादिष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • सिमरिंग
  • व्हिस्कीन्ग
  • चिलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खरबुज - १ कप ( सोलून तुकडे केलेले)
  2. साखर - २-३ टेबलस्पून
  3. व्हेज जिलेटीन - 3/4 टीस्पून
  4. पाणी - १/४ कप खरबुज साठी + २-३ टेबलस्पून जिलेटीन फुगवण्यासाठी

सूचना

  1. गॅसवर पॅन किंवा टोप ठेवा. त्यात पाणी साखर आणि खरबूज टाकून थोडासा नरम करून घ्या.
  2. थंड करून मिक्सर ला वाटून घ्या. गाळून घ्या.
  3. एका पेल्यात पाणी घेऊन त्यात जिलेटीन टाका. ते ब्लूम होऊ द्या.
  4. खरबुज प्युरी आणि फुललेले जिलेटीन एका पॅन मध्ये टाकून चांगले विस्क करून घ्या. आंच मंद ठेवा.
  5. थोडे घट्ट होऊ लागले कि पटकन सिलिकॉन मोल्ड किंवा साच्यात घाला आणि सेट होऊ द्या.
  6. रेफ्रिजेरटर मध्ये ३० मिनिट्स ठेवा .
  7. सेट झाली कि आईसक्रीम बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर