हलवुणे | Halavune Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  4th Jun 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Halavune recipe in Marathi,हलवुणे, Sudha Kunkalienkar
हलवुणेby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4

3

हलवुणे recipe

हलवुणे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Halavune Recipe in Marathi )

 • साबुदाणे १ कप ८ तास भिजवून 
 • ताजा खवलेला नारळ दीड कप 
 • चिरलेला गूळ सव्वा कप 
 • दूध १ कप 
 • वेलची पूड पाव चमचा 
 • केशर ३-४ काड्या दुधात भिजवून
 • काजूचे तुकडे २ चमचे 
 • तूप २ चमचे 
 • मीठ २-३ चिमूट 

हलवुणे | How to make Halavune Recipe in Marathi

 1. भिजवलेले साबुदाणे मोकळे करून घ्या. 
 2. एका पातेल्यात १ चमचा तूप गरम करून काजूचे तुकडे तळून घ्या. 
 3. त्याच पातेल्यात साबुदाणे घालून २-३ मिनिटं परतून घ्या. 
 4. साबुदाण्यात १ कप गरम दूध घालून २-३ मिनिटं मंद आचेवर शिजवा. 
 5. त्यात नारळ, गूळ, मीठ घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवा. सारखे ढवळत राहा. 
 6. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड, केशर आणि काजूचे तुकडे घाला. शिजवा. 
 7. मिश्रण कडेनी सुटायला लागलं की एका तूप लावलेल्या ताटलीत काढा आणि एकसारखं पसरवा. वरून १ चमचा तूप पसरवा.
 8. थंड झाल्यावर तुकडे करा आणि सर्व्ह करा स्वादिष्ट हलवुणे. 
 9. हलवुणे फ्रिज मध्ये ठेवा. 

My Tip:

मी नेसर्गिक गूळ वापरला आहे. हलवुण्याचा रंग गुळाच्या रंगावर अवलंबून आहे

Reviews for Halavune Recipe in Marathi (3)

लेखा औसरकर5 months ago

मस्त रेसिपी
Reply

Aarti Nijapkar5 months ago

Khup chaan
Reply

Pranali Deshmukh5 months ago

मस्त￰
Reply

Cooked it ? Share your Photo