टोस्ट सँडविच | Toast Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Toast Sandwich recipe in Marathi,टोस्ट सँडविच, Deepa Gad
टोस्ट सँडविचby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

टोस्ट सँडविच recipe

टोस्ट सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Toast Sandwich Recipe in Marathi )

 • ब्रेड पॅकेट १
 • बटाटे २ मोठे
 • कांदे ३
 • टोमॅटो १ मोठा
 • हिरवी मिरची ४-५
 • कढीपत्ता
 • हळद पाव च
 • तिखट १/२ च
 • तेल १ च
 • मीठ चवीनुसार
 • नायलॉन सेव १ वाटी
 • टोमॅटो केचअप आवडीनुसार

टोस्ट सँडविच | How to make Toast Sandwich Recipe in Marathi

 1. बटाटे मायक्रोवेव्ह मध्ये ५ मिनिटे शिजवून घ्यावेत
 2. बटाटे शिजतात तोपर्यंत कांदे व टोमॅटो स्लाईसर वर कीसून घ्या, ही. मिरच चिरा
 3. गॅसवर भांड्यात तेल घालून त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो टाकून कच्चेपण जाईपर्यंतच शिजवा
 4. नंतर हळद, तिखट ,मीठ शिजलेला बटाटा साल काढून हातानेच कुस्करून त्यात घाला.
 5. एकजीव करा २ मिनिटाने गॅस बंद करा हे झाले सँडविचचे सारण तयार
 6. ब्रेड घेऊन त्यात वरील सारण पसरून दाबून घ्या त्यावर कांदा, टोमॅटो, मिरची आवडीप्रमाणे घाला
 7. भरलेल्या सारणाच्या ब्रेडवर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा
 8. सँडविच टोस्टर मध्ये ठेवून ३ मिनिटे भाजा
 9. कापुन घ्या व त्यावर टोमॅटो सॉस लावून नायलॉन शेव पसरा वरून कांदा घाला

My Tip:

यात तुम्ही आवडीनुसार सिमला मिरची, गाजराचा किस ही घालू शकता

Reviews for Toast Sandwich Recipe in Marathi (0)