लाल भोपळा स्टफ पराठा | LalbhopLa Stuffed Paratha Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • LalbhopLa Stuffed Paratha recipe in Marathi,लाल भोपळा स्टफ पराठा, Vaishali Joshi
लाल भोपळा स्टफ पराठाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

लाल भोपळा स्टफ पराठा recipe

लाल भोपळा स्टफ पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make LalbhopLa Stuffed Paratha Recipe in Marathi )

 • १ वाटी किसलेला लाल भोपळा
 • १ चमचा काळे तिळ
 • तिखट आवडीनुसार
 • १/४ हळद
 • १/२ चमचा चाट मसाला
 • १ धणे जीरे पावडर
 • थोडा हिंग
 • मीठ चवीप्रमाणे
 • कोथिंबिर
 • १ वाटी कणिक
 • साजुक तूप

लाल भोपळा स्टफ पराठा | How to make LalbhopLa Stuffed Paratha Recipe in Marathi

 1. लाल भोपळा किसुन घ्या १ वाटी भर
 2. कणिक मीठ टाकुन भिजवून ठेवा
 3. गैस वर कढईत किंचित तूप घालून किस वाफवून घेउन थंड करुन घ्या
 4. आता यात तिखट हळद मीठ तिळ चाट मसला ध णे जीरे पावडर हिंग आणि कोथिंबिर घालून मिक्स करुन सारण करा
 5. कणकचे गोळे करून घ्या
 6. दोन छोट्या पोळ्य़ा लाटून मधे सारण भरुन पराठा लाटून घ्या
 7. गैस वर तवा गरम करुन घेउन त्यावर तयार पराठा टाका . दोन्ही बाजूनी तूप लाऊन भाजून घ्या
 8. गरमा गरम पराठा खाऊ घाला

Reviews for LalbhopLa Stuffed Paratha Recipe in Marathi (0)