मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पोहे

Photo of Kanda Poha by Sujata Hande-Parab at BetterButter
748
3
0.0(0)
0

कांदा पोहे

Jun-04-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पोहे कृती बद्दल

कांदा पोहे हि महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे. सकाळची न्याहारी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स पोहे हे सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. पटकन होणारी आणि अतिशय पौस्टिक अशी हि डिश थोड्याश्या लिंबाच्या रसाने आणि शेव टाकून खूपच लज्जतदार लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहा - 1 1/2 कप (पूर्णपणे धुऊन आणि गाळून घ्यावे.)
  2. मोहोरी - 1/2 टीस्पून
  3. जिरे - 1/2 टीस्पून
  4. कढीपत्ता - 4-५ पाने
  5. कांदा मध्यम - 1 बारीक चिरून
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - 1 1/2 टेबलस्पून   
  7. हिरव्या मिरच्या - 2 बारीक चिरून
  8. हळद पावडर - 1/2 टिस्पून
  9. साखर - 1 टेबलस्पून
  10. तेल - 1 टेबलस्पून 
  11. भाजलेले शेंगदाणे - 1 1/2 टेबलस्पून 
  12. ताजे किसलेला नारळ - 1/2 टेबलस्पून (पर्यायी)
  13. चवीनुसार मीठ
  14. सर्व्हिंगसाठी - बारीक शेव् लिंबू तुकडे , बारीक चिरलेला कांदा

सूचना

  1. एक कढई किंवा नॉनस्टिक्स पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घाला. त्याला तडतडू द्या .
  2. कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  3. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर पाने टाका. 1 मिनिट शिजू द्या.
  4. हळद, साखर घाला. साखर विरघळे पर्यंत चांगले मिक्स करावे.
  5. धुतलेले आणि गाळून घेतलेले पोहे घाला. हलक्या हाताने मिक्स करावे किंवा ते टॉस करा
  6. भाजलेले कुटलेले शेंगदाणे आणि किसलेले नारळ घाला. हलक्या हाताने मिक्स करावे.
  7. कोणत्याही मसालेदार किंवा फ्लेवर्स शेव् घाला
  8. लिंबू तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
  9. एक कप चहा किंवा कॉफी घेऊन गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर