भाकरी पॉकेट | Bhakri Pocket Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhakri Pocket recipe in Marathi,भाकरी पॉकेट, Vaishali Joshi
भाकरी पॉकेटby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

भाकरी पॉकेट recipe

भाकरी पॉकेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhakri Pocket Recipe in Marathi )

 • १ कप ज्वारी पीठ
 • १/४ कप शेगदाणे
 • ६-७ लसूण पाकळ्य़ा
 • जीर
 • तिखट
 • आमचूर
 • मीठ
 • तेल
 • १ कांदा
 • कोथिंबिर

भाकरी पॉकेट | How to make Bhakri Pocket Recipe in Marathi

 1. सर्वात पहिले ज्वारी पीठ मीठ टाकुन पाण्याने भिजवून ठेवा
 2. शेंगदाणे हलकेशे भाजून घ्या
 3. खाली उतरवून त्यात तिखट
 4. लसुण
 5. मीठ
 6. आमचूर
 7. जीर घालून मिक्सर मधे चटनी करुन घ्या
 8. वाटीत चटनी काढून घेउन त्यात कच्च तेल टाकुन पेस्ट करुन घ्या
 9. थोड़ी चटनी कोरडीच ठेवा
 10. कांदा आणि कोथिंबीर बारीक़ चिरुन ठेवा
 11. मळलेल्या पीठाचे गोळे करुन घेवुन भाकरी करुन घ्या
 12. गैस वर तवा ठेउन भाकरी करुन छान फुगली पाहिजे
 13. खाली काढून भाकरी ला एका बाजूने थोडा काप देऊन आत मधे पहिले चटनी ची लेअर लावा वर कांदा कोथिंबीर ची लेअर लावा त्या वर कोरडी चटनी ( तेल न घातलेली )भुर्भुरवा
 14. आणि टेस्टी अशी गावरान झटका भाकरी खायला द्या

My Tip:

तुमच्या आवडीचे फिलिंग भरू शकता

Reviews for Bhakri Pocket Recipe in Marathi (0)