पॅन सीअर्ड मसाला अंडी | Pan Seared Masala Eggs Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pan Seared Masala Eggs recipe in Marathi,पॅन सीअर्ड मसाला अंडी, Sujata Hande-Parab
पॅन सीअर्ड मसाला अंडीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

पॅन सीअर्ड मसाला अंडी recipe

पॅन सीअर्ड मसाला अंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pan Seared Masala Eggs Recipe in Marathi )

 • अंडी - २-३ (उकडून घेतलेली)
 • कांदा - १ मोठा बारीक चिरून घेतलेला
 • हळद - १/२ टीस्पून 
 • गरम मसाला - १/२ टीस्पून
 • लाल मिरची पावडर - १/२ - १ टीस्पून
 • मीठ एक छोटी चिमूट भर 
 • तेल - १ टेबलस्पून 
 • बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून
 • सर्विंग साठी - ब्राउन पाव 

पॅन सीअर्ड मसाला अंडी | How to make Pan Seared Masala Eggs Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यावा. जास्त काळा करू नये.
 2. त्यात लालमिर्ची पूड, गरम मसाला, मीठ, हळद घालून थोडे परतून घ्यावे.
 3. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने घालून थोडे परतून घ्यावे.
 4. उकडलेली अंडी दोन सामान भागामध्ये कापून मसाल्यात अलगद ठेवावी.
 5. कांदा मसाला व्यवस्तीत त्यावर पसरून घ्यावा. २ मिनिटे तशीच ठेवावी. आच मंद मध्यम असावी.
 6. अलगद पालटून दुसया बाजूने देखील १-२ मिनिटे भाजून घ्यावीत.
 7. अंडी दोन्ही बाजूनी थोडी क्रिस्पि झाल्यावर शेगडी बंद करावी.
 8. गरमागरम चपाती किंवा डाळभात बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करावी.

Reviews for Pan Seared Masala Eggs Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo