मुख्यपृष्ठ / पाककृती / पॅन सीअर्ड मसाला अंडी

Photo of Pan Seared Masala Eggs by Sujata Hande-Parab at BetterButter
562
3
0.0(0)
0

पॅन सीअर्ड मसाला अंडी

Jun-08-2018
Sujata Hande-Parab
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पॅन सीअर्ड मसाला अंडी कृती बद्दल

पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश बहुतेक घरात प्रामुख्याने बनवली जाते. अतिशय पटकन होणारी आणि खूपच कमी पदार्था वापरून केली जाते. घाईच्या वेळेला अनेकदा काही दुसरा पर्याय नसेल तर केली जाते. चपाती, डाळभात किंवा ब्रेड पाव बरोबर अतिशय स्वादिष्ट लागते. अंड्यांचा सफेद भाग कुरकुरीत झाल्यामुळे एक वेगळीच चव ह्या डिशला येते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अंडी - २-३ (उकडून घेतलेली)
  2. कांदा - १ मोठा बारीक चिरून घेतलेला
  3. हळद - १/२ टीस्पून 
  4. गरम मसाला - १/२ टीस्पून
  5. लाल मिरची पावडर - १/२ - १ टीस्पून
  6. मीठ एक छोटी चिमूट भर 
  7. तेल - १ टेबलस्पून 
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून
  9. सर्विंग साठी - ब्राउन पाव  

सूचना

  1. एका पॅन मध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यावा. जास्त काळा करू नये.
  2. त्यात लालमिर्ची पूड, गरम मसाला, मीठ, हळद घालून थोडे परतून घ्यावे.
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने घालून थोडे परतून घ्यावे.
  4. उकडलेली अंडी दोन सामान भागामध्ये कापून मसाल्यात अलगद ठेवावी.
  5. कांदा मसाला व्यवस्तीत त्यावर पसरून घ्यावा. २ मिनिटे तशीच ठेवावी. आच मंद मध्यम असावी.
  6. अलगद पालटून दुसया बाजूने देखील १-२ मिनिटे भाजून घ्यावीत.
  7. अंडी दोन्ही बाजूनी थोडी क्रिस्पि झाल्यावर शेगडी बंद करावी.
  8. गरमागरम चपाती किंवा डाळभात बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर