मुख्यपृष्ठ / पाककृती / हार्ड बॉइलइड अंडी चाट

Photo of Hard boiled egg chat by Sujata Hande-Parab at BetterButter
857
3
0.0(0)
0

हार्ड बॉइलइड अंडी चाट

Jun-08-2018
Sujata Hande-Parab
3 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हार्ड बॉइलइड अंडी चाट कृती बद्दल

उकडलेली अंडी हि एक महाराष्ट्रीयन पॉप्युलर डिश आहे. अंडी उकडून ती अशीच किंवा त्यावर थोडी सीजनिंग करून खाल्ली जातात. लहान मुलांचा उकडलेली अंडी हा एक आवडता पदार्थ आहे. मुंबई मध्ये काही ठिकाणी असा प्रकारची उकडलेली अंडी चाट मसाला तिखट पूड घालून सर्व्ह केली जातात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी - २
  2. चाट मसाला - १/२ टीस्पून  
  3. लाल मिरची पावडर - १/२ टीस्पून
  4. मीठ एक छोटी चिमूट भर 
  5. सजावटीसाठी - काप केलेली काकडी, कांदा, लिंबू 

सूचना

  1. एका टोपात पाणी ठेवून अंडी आणि किंचित मीठ घालावे . मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
  2. पाण्याला उकळी आल्यानंतर आच मंद करावी. २-३ मिनिटे तसेच ठेवावे.
  3. नंतर शेगडी बंद करून टोपावर झाकण ठेवून अंडी 15-16 मिनिटे तशीच ठेवावी आणि वाफेवर शिजू द्यावीत. पाणी गाळून घेऊन थंड पाणी टाकून अंडी सोलून घ्यावीत.
  4. दोन भाग करून ताटात घ्यावीत. त्यावर चाट मसाला, लाल तिखट पूड, थोडे मीठ भुरभुरून घ्यावे.
  5. काप केलेला कांदा, काकडी, लिंबू बरोबर गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर