मुख्यपृष्ठ / पाककृती / तमागोयकी (जापनीज ऑम्लेट)

Photo of Tamagoyaki ( Japanese Omelette) by Sujata Hande-Parab at BetterButter
487
6
0.0(0)
0

तमागोयकी (जापनीज ऑम्लेट)

Jun-08-2018
Sujata Hande-Parab
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तमागोयकी (जापनीज ऑम्लेट) कृती बद्दल

तमागोयकी हा एक प्रकारचा जपानी आमलेट चा प्रकार आहे जो शिजवलेल्या अंडीच्या विविध स्तरांवर एकत्र आणून केला जातो. हे सामान्यतः आयताकृती पॅन वापरून तयार केले जाते जे माकियाँकिनेब(makiyakinabe) किंवा तामागोईकी पॅन असे म्हणतात. हे सकाळी न्याहारीसाठी खाल्ले जाते. हे मूलतः अंडी, साखर, सोया सॉस किंवा मिरिन वापरून तयार जाते तयार करण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते मी सामान्य गोल नॉनस्टीक पॅन वापरून हे ऑम्लेट बनवलेले आहे. ह्यामध्ये प्रथम दोन्ही बाजूं दुमडून घेणे आवश्यक आहे आणि नंतरच रोल करावे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • जॅपनीज
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडी - 3
  2. सोया सॉस- १/४ टीस्पून
  3. साखर - १/४ टीस्पून
  4. ग्राउंड किंवा कुटलेली काळी मिरी - १/२ टिस्पून
  5. चवीनुसार मीठ 
  6. तेल - १/२ टेबलस्पून

सूचना

  1. एका खोल बाउलमध्ये अंडी, सोया सॉस, कुटलेली काळी मिरी, साखर आणि मीठ घ्या. चांगले फेस येईपर्यंत फेटून घ्या.
  2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंड्याचा मिश्रणाचा एक पातळ थर घाला. पॅन थोडे हलवून समान रीतीने पसरवा आणि कमी ज्योत वर काही सेकंद सेट होऊ द्या.
  3. लाकडी फोर्क किंवा काटा चमच्यांचा पाठचा भाग वापरून आम्लेट गुंडाळून घ्यावे.
  4. पहिल्यांदा दोन्ही बाजूनी दुमडून घ्या. नंतर गोलाकार रोल करून घ्या. मिश्रण तोडे ओले असतानाच हि क्रिया करावी.
  5. हा लॉग पॅन मधेच पण एका टोकापासून दूर ठेवा.
  6. परत अंड्याचे थोडे मिश्रण ओतून घ्या आणि समान पसरवून घ्या.
  7. काही सेकंड सेट झाल्यावर चमच्याने फोल्ड किंवा दुमडून घ्या. आणि जो रोल बनवून ठेवला होता त्याला घेऊनच रोल करून घ्या.
  8. प्रक्रिया तिसर्यांदा पुन्हा करा आणि सर्व अंडी मिश्रण वापरले जात नाही तोपर्यंत करा आणि सांगितलेल्या पद्धतीनेच रोल करा.
  9. झाल्यावर एग रोल एका ताटात कडून घ्या. एक अलुमिनिम फॉईल वापरून तो व्यवस्तीत त्यात दुमडून किंवा रोल करून घ्या.
  10. 4-5 मिनिटे बाजूला ठेवा. गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर