मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज गार्लिक ब्रेड स्टिकस

Photo of Quick Cheese Garlic Bread Sticks by Sujata Hande-Parab at BetterButter
745
6
0.0(0)
0

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस

Jun-08-2018
Sujata Hande-Parab
12 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस कृती बद्दल

अतिशय जलद आणि तयार ब्रेड पासून केलेल्या ब्रेडस्टीक खूपच टेस्टी लागतात. कधी कधी आपण सँडविच करताना कडा कापून टाकून देतो त्या ऐवजी आपण असा प्रकारे ब्रेड स्टिक तयार करू शकतो. किंवा तो ब्रेड बेक करून त्याचा चुरा आपण तळताना कव्हरिंग साठी वापरू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्राउन ब्रेड - ४-५ ( सरळ कापून तुकडे केलेले)
  2. लसूण मिन्सड किंवा बारीक ठेचून घेतलेली - १ टीस्पून 
  3. लाल मिरची जाडसर वाटलेली किंवा फ्लेक्स - १/२ -१ टीस्पून  
  4. ओरेगॅनो - १ टीस्पून 
  5. बेसिल पाने सुकलेली - १ टीस्पून
  6. तेल - १ १/२ टेबलस्पून 
  7. मीठ एक छोटीसी चिमूटभर
  8. किसलेले चीज - ३-४ टेबलस्पून (कोणतेही जे उपलब्ध असेल ते.)

सूचना

  1. ओव्हन २०० डिग्री सेल्सिअस ला गरम करून घेणे. ब्रेड चे उभे तुकडे करून घ्या.
  2. बेसिल पाने, ओरेगॅनो ग्राइंडर ला लावून जाडसर वाटून घ्या.
  3. एका छोट्या वाडग्यात तेल घेऊन त्यात जाडसर वाटलेली लसूण, बेसिल पाने, ओरेगॅनो, मीठ, तेल घेऊन एकत्र करावे.
  4. चांगले मिक्स करून थोडावेळ झाकून बाजूला ठेवावे. जास्त मीठ वापरू नये. ब्रेडमध्ये आणि चीज मध्ये आधीच थोडे मीठ असते.
  5. एका बेकिंग ट्रे मध्ये ब्रेड चे तुकडे ठेवून मसाले इन्फयुज्ड तेल त्यावर व्यवस्तिथ लावून घ्यावे.
  6. पूर्व गरम केलेल्या ओव्हन मध्ये 4-5 मिनिटे किंवा टॉप कुरकुरीत ब्राउन होई पर्यंत बेक करावे.
  7. बाहेर काढून किसलेले चीज पसरवून परत ओव्हन मध्ये १-२ मिनिटांसाठी बेक करावे. तापमान तेच ठेवावे.
  8. क्रीम चीज डीप किंवा टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर