पोटैटो नेस्ट सैंडविच | Potato Nest Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Nest Sandwich recipe in Marathi,पोटैटो नेस्ट सैंडविच, Vaishali Joshi
पोटैटो नेस्ट सैंडविचby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

पोटैटो नेस्ट सैंडविच recipe

पोटैटो नेस्ट सैंडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Nest Sandwich Recipe in Marathi )

 • थोड़े मोठे ४ बटाटे
 • कॉर्न फ्लोर २ चमचे
 • लिंबू रस १ चमचा
 • मिरे पुड १/२ चमचा
 • मीठ
 • चाट मसला
 • कांदा १
 • टोमेटो १
 • हिरवी मिर्ची १
 • पीझा सॉस २ चमचे
 • मेयोनिज २ चमचे
 • बटर

पोटैटो नेस्ट सैंडविच | How to make Potato Nest Sandwich Recipe in Marathi

 1. तयारी करुन घेउ पाहिले - कांदा गोल गोल कापून घ्या टोमाटोच्या बिया काढून लांब आकारात चिरुन ठेवा बटाटे सोलून किसुन ठेवा मिर्ची चिरुन घ्या मिरे कुतुन ठेवा
 2. बटाट्य़ा च्या किसात लिंबू रस , मीठ , मिरे पुड टाकुन घ्या मिक्स करा आणि कॉर्नफ्लोर भुरभुरवा
 3. गैस वर तवा गरम करुन बटर घालून त्यावर बटाटयाचा किस पसरवा त्याला सराट्य़ाच्या साह्याने ब्रेड सारखा चौकोन आकार द्या आणि हाय फ्लेम वर खालची साइड गोल्डन झाली की बाजूला काढून ठेवा आणि अजुन अशीच एक स्लाइस करुन घ्या
 4. तव्या वर एक स्लाइस टाका त्यावर पिझा सॉस आणि मेयोनिज एकत्र करून त्याची लेअर लावा कांदा टोमेटो मिर्ची टाका त्यावर थोड मीठ आणि चाट मसाला टाका , थोड चीज किसुन घाला
 5. पुन्हा त्यावर पिझा सॉस आणी मेयोनिज ची लेअर लावून तयार करुन ठेवलेली स्लाइस गोल्डन बाजू आतल्या साइडने ठेवा
 6. साइडने बटर सोडा दोन्ही बाजु व्यवस्थीत गोल्डन रंगावर होउ द्या
 7. प्लेट मधे काढून कट करा आणि सर्व्ह करा

Reviews for Potato Nest Sandwich Recipe in Marathi (0)