अळकुडीचे कबाब / अरबी कबाब | Arbi Kabab / Alkudiche Kabab Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Arbi Kabab / Alkudiche Kabab recipe in Marathi,अळकुडीचे कबाब / अरबी कबाब, Sudha Kunkalienkar
अळकुडीचे कबाब / अरबी कबाबby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

अळकुडीचे कबाब / अरबी कबाब recipe

अळकुडीचे कबाब / अरबी कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Arbi Kabab / Alkudiche Kabab Recipe in Marathi )

 • अळकुडी पाव किलो 
 • जाडे पोहे १ कप 
 • साबुदाणा पीठ २ मोठे चमचे 
 • शेंगदाणा कूट १ चमचा 
 • आले ठेचून अर्धा चमचा 
 • गरम मसाला अर्धा चमचा 
 • तीळ अर्धा चमचा 
 • मिरची ठेचून अर्धा चमचा 
 • लाल तिखट अर्धा चमचा
 • ओवा अर्धा चमचा 
 • चिरलेली कोथिंबीर २ चमचे 
 • काजूचे बारीक तुकडे १ चमचा 
 • कोकम ३-४
 • मीठ चवीनुसार 
 • तेल कबाब भाजायला 
 • बारीक रवा + तांदूळ पीठ कबाब घोळवायला 

अळकुडीचे कबाब / अरबी कबाब | How to make Arbi Kabab / Alkudiche Kabab Recipe in Marathi

 1. अळकुडी धुवून कोकम आणि मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. 
 2. गार झाल्यावर सालं काढून किसून घ्या. 
 3. पोहे धुवून निथळून घ्या आणि ५ मिनिटे झाकून ठेवा.
 4. सर्व साहित्य एकत्र करून पीठ एकजीव करा. 
 5. आवडीप्रमाणे कबाब बनवून रवा + तांदुळाच्या पिठात घोळवून  तव्यावरतेल घालून भाजून घ्या. 
 6. गरमागरम खमंग कबाब सॉस / चटणी बरोबर सर्व्ह करा.  

My Tip:

अळकुडी किसायच्या आधी किसणीला थोडं तेल लावा म्हणजे चिकटणार नाही

Reviews for Arbi Kabab / Alkudiche Kabab Recipe in Marathi (0)