मुख्यपृष्ठ / पाककृती / अळकुडीचे कबाब / अरबी कबाब

Photo of Arbi Kabab / Alkudiche Kabab by Sudha Kunkalienkar at BetterButter
737
1
0.0(0)
0

अळकुडीचे कबाब / अरबी कबाब

Jun-11-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळकुडीचे कबाब / अरबी कबाब कृती बद्दल

अळकुडी (अरबी) खूप पौष्टिक असते. मी अळकुडीचे पॅटिस बनवले होते; ते खूप छान झाले. काल मी अळकुडीचे कबाब बनवले. ही माझी स्वतः ची रेसिपि आहे.  त्यात पोहे भिजवून घातले. साबुदाणा पीठ, शेंगदाणा पीठ वगैरे घातलं. खूप चविष्ट झाले कबाब. तुम्हीही करून पहा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अळकुडी पाव किलो 
  2. जाडे पोहे १ कप 
  3. साबुदाणा पीठ २ मोठे चमचे 
  4. शेंगदाणा कूट १ चमचा 
  5. आले ठेचून अर्धा चमचा 
  6. गरम मसाला अर्धा चमचा 
  7. तीळ अर्धा चमचा 
  8. मिरची ठेचून अर्धा चमचा 
  9. लाल तिखट अर्धा चमचा
  10. ओवा अर्धा चमचा 
  11. चिरलेली कोथिंबीर २ चमचे 
  12. काजूचे बारीक तुकडे १ चमचा 
  13. कोकम ३-४
  14. मीठ चवीनुसार 
  15. तेल कबाब भाजायला 
  16. बारीक रवा + तांदूळ पीठ कबाब घोळवायला 

सूचना

  1. अळकुडी धुवून कोकम आणि मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. 
  2. गार झाल्यावर सालं काढून किसून घ्या. 
  3. पोहे धुवून निथळून घ्या आणि ५ मिनिटे झाकून ठेवा.
  4. सर्व साहित्य एकत्र करून पीठ एकजीव करा. 
  5. आवडीप्रमाणे कबाब बनवून रवा + तांदुळाच्या पिठात घोळवून  तव्यावरतेल घालून भाजून घ्या. 
  6. गरमागरम खमंग कबाब सॉस / चटणी बरोबर सर्व्ह करा.  

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर