मालवणी चणा उसळ | Malvani Chana Usal Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Malvani Chana Usal recipe in Marathi,मालवणी चणा उसळ, Deepa Gad
मालवणी चणा उसळby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  11

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

16

0

मालवणी चणा उसळ recipe

मालवणी चणा उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Malvani Chana Usal Recipe in Marathi )

 • १ मोठी वाटी लाल चणे
 • कांदे ३
 • ओले खोबरे अर्धी कवड
 • आलं लसूण पेस्ट १ च
 • मालवणी मसाला २ च
 • टोमॅटो अर्धा
 • कढीपत्ता
 • तेल
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर

मालवणी चणा उसळ | How to make Malvani Chana Usal Recipe in Marathi

 1. प्रथम रात्रभर चणेे पाण्यात भिजवून ठेवा
 2. सकाळी चणे धुवून कुकरमध्ये लावून ४-५ शिट्ट्या करा
 3. वाटणासाठी : कढईत २ कांदे उभे चिरून घाला लालसर होईपर्यंत परता नंतर त्यात ओले खोबरे घालून लालसर होईपर्यंत भाजा
 4. थंड झाल्यावर त्याचे मिक्सरवर वाटण करून घ्या
 5. कढईत २ मोठे चमचे तेलात कढीपत्ता, चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्या
 6. आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला घालून चांगला परतून घ्या
 7. नंतर शिजवलेले चणे, वाटलेलं वाटण, मीठ घालून एक उकळी आली की गॅस बंद करा
 8. वरून कोथिंबीर पेरा
 9. ही उसळ भाकरी, चपातीबरोबर छान लागते सोबत कांदा घ्या

My Tip:

चणे कुकरमध्ये चांगले शिजले पाहिजेत

Reviews for Malvani Chana Usal Recipe in Marathi (0)