मुख्यपृष्ठ / पाककृती / एगभुर्जी रैप

Photo of Eggbhurji Wrap by Vaishali Joshi at BetterButter
155
1
0.0(0)
0

एगभुर्जी रैप

Jun-12-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एगभुर्जी रैप कृती बद्दल

झटपट होणारी सोपी रेसिपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी २
  2. कांदा १ छोटा
  3. हिरवी मिर्ची १
  4. टोमेटो १
  5. कोथींबिर
  6. तेल
  7. राई
  8. तिखट
  9. मीठ
  10. हळद
  11. लिंबू रस
  12. कणिक

सूचना

  1. पहिले कणिक थोड मीठ आणि २चमचे तेल टाकुन पाण्याने भिजवून घेउन बाजूला झाकून ठेवा
  2. एक बाऊल मधे अंडी फोडून घ्या त्यात २ चमचे दूध टाकुन फेटून घ्या
  3. कांदा मिर्ची टोमेटो कोथिंबीर चिरुन घ्या
  4. गैस वर कढ़ई तापत ठेउन थोडस तेल घाला गरम झाले की त्याच्यात अनुक्रमे मोहोरी , कांदा , मिर्ची , टोमेटो घालून परतून घ्या .तिखट हळद घालून फेट्लेले अंडी घाला परतून घ्या छान लहीदार अंडा भुर्जी तयार होइल .मीठ आणि लिंबू रस टाकुन परतून घेउन खाली उनरउन ठेवा
  5. भिजवून ठेवलेल्या कणकेचे मोठे मोठे गोळे करून घ्या .एक गोळा घेउन पोळी लाटा तेल लावून ३-४ दा घडी करून मोठी पोळी लाटून घ्या . त्याच्यात अंडाभुर्जी भरून रोल करून घ्या आणि तव्या वर बटर घालून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या
  6. प्लेट मधे कापून सॉस किंवा चटनी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर