कैरीचं पन्हं | Kairiche Panhe / Aam Panha Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kairiche Panhe / Aam Panha recipe in Marathi,कैरीचं पन्हं, Sudha Kunkalienkar
कैरीचं पन्हंby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

1

0

कैरीचं पन्हं recipe

कैरीचं पन्हं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairiche Panhe / Aam Panha Recipe in Marathi )

 • कैरी मध्यम १
 • चिरलेला गूळ साधारण कैरीच्या गराएवढा 
 • मिरचीचा छोटा तुकडा 
 • मीठ चवीनुसार 
 • वेलची पूड पाव चमचा 
 • केशर २-३ काड्या 

कैरीचं पन्हं | How to make Kairiche Panhe / Aam Panha Recipe in Marathi

 1. कैरी धुवून, साल काढून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. 
 2. गार झाल्यावर गर काढा. 
 3. मिक्सर च्या भांड्यात कैरीचा गर, गूळ, मीठ आणि मिरची घाला आणि अगदी बारीक पेस्ट करून घ्या. हवे असल्यास पाणी घाला. 
 4. कैरीला शीरा असतील तर मिश्रण गाळून घ्या नाहीतर वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये ओता. 
 5. हवा असल्यास आणि गूळ घाला. 
 6. पाणी घालून पन्हं जेवढे पातळ हवे असेल तेवढे करा.  वेलची पूड आणि केशर घालून फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा. 
 7. थंडगार पन्हं सर्व्ह करा. 

My Tip:

दाट पन्हं बनवून फ्रीझ मध्ये ठेवा. लागेल तसं पाणी घालून सर्व्ह करा. ४-५ दिवस फ्रीझ मध्ये चांगले राहते.

Reviews for Kairiche Panhe / Aam Panha Recipe in Marathi (0)